•अनेकांचे प्राण वाचविले मग हलगर्जीपणा कुठला?
•’ षडयंत्र’ बसून रचणारा’ तो ‘ कोण ? लवकरच पितळ उघडे पडण्याची दाट शक्यता.
अजय कंडेवार,वणी:- डॉ. महेंद्र लोढा यांचा ग्रामीण रग्णालय वणी येथील मानवी स्त्रीरोग तज्ञ या पदाचा राजीनामा नामंजूर करण्यात यावा ,याकरिता राष्ट्रवादी युवक काँग्रेस मुबीन पिरसाहब शेख (युवा यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष) व शहर राष्ट्रवादीचा कार्यकर्त्यांनी वणी SDO यांना (दि.7ऑगस्ट) रोजी निवेदनाद्वारे साकडे घातले आहे.”That “innocuous defamation… Reject the resignation of Dr. Lodha. Many lives were saved, so where is the laziness? Who is the ‘conspiracy’? There is a strong possibility that the brass will be exposed soon.
मागील 3 से 4 दिवसापासून समाजातील काही विशिष्ठ लोकांकडून डॉ. महेंद्र ओढा यांच्या संबंधीत एक प्रकरण समाजमाध्यमाद्वारे नाहक बदनामी कारक एक पोस्ट चालवत आहे. डॉ. महेंद्र लोढा हे कित्येक वर्षापासून ग्रामीण रुग्णालय वणी येथे निस्वार्थ सेवा देत आहे.त्यांच्यामुळेच ग्रामीण रुग्णालय वणी येथे गरीब रुग्णाच्या प्रसुती, सिजेरीयन ऑपरेशन, सोनोग्राफी, कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया सुरळीतपणे चालू आहे. त्यांनी आजपर्यंत कामात काहीही हयगय किंवा हलगर्जीपणा केला नाही, त्यांच्यामुळेच आजपर्यंत ग्रामीण रुग्णालयात हजारो रुग्णांचे प्राण वाचलेले आहे.
परंतु मागील काही दिवसापासून समाज माध्यमावर काही विशिष्ट लोकापासून त्यांची बुध्दी पुरस्कृत नाहक बदनामी चालु आहे. त्यामुळे व्यथीत होऊन त्यांनी मानकसेवेतून ग्रामीण रुग्णालय वणी येथील पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता ग्रामीण रुग्णालयात स्त्री तज्ञ कोणीही नाही आणि विनाकारण गरजू व गरीब स्त्रियांचे हाल होईल.तरी त्वरीत डॉ. महेंद्र लोढा यांचा राजीनामा नामंजूर नामंजुर करावे व समाजातील काही विशिष्ठ लोक जे त्यांची समाज माध्यमावर बदनामी करत त्यांच्यावर कठोर कार्यवाही करण्यात आली. ही विनंती. तरीही नाहक बदनामी करणाऱ्यावर योग्य ती कार्यवाही करण ग्रामीण रुग्णालय वणी येथील प्रसुती व ईतर बाबीची हेळसांड होवु नये याची काळजी घ्यावी असे जर होत असेल तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आला.
यावेळी मुबीन शेख, विजय नगराळे,रामकृष्ण वैदय, अजय अनपुरे, चेतन चौधरी, सुरेश पिसे, शकिल शेख,मेघराज गेडाम, इम्रान शेख व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.