• पत्रकार परिषदेत आरोप व खुलासे .
अजय कंडेवार,वणी:-येथील ग्रामीण रुग्णालयात जन्माला आलेल्या नवजात बाळाच्या शारीरिक प्रकृतीवरुन करण्यात येत असलेले आरोप बिनबुडाचे असून हेतुपूरस्पर या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केले जात आहे. असा घणाघाती आरोपही डॉ.लोढा यांनी केला.मागील दोन तीन दिवसांपासून सोशल मीडियावर नवजात बाळाच्या फोटोसह नाव बदनाम करण्याचा षडयंत्र काही लोक रचत आहे. असेही आरोप व खुलासा येथील डॉ. महेंद्र लोढा यांनी शुक्रवार 4 ऑगस्ट रोजी येथील शासकीय विश्राम गृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. तसेच मानसेवी (आयपीएचएस) या पदावरून राजीनामा दिल्याची खळबळजनक माहिती डॉ. लोढा यांनी यावेळी दिली.that” complaints, resignations.and baseless allegations. Allegations and revelations in the press conference.
काय आहे प्रकरण…….. वाचा
वणी येथील प्रख्यात स्त्रीरोग तज्ञ चिकित्सक व लोढा मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. महेंद्र लोढा हे वणी ग्रामीण रुग्णालयात मानवसेवी स्त्रीरोग चिकित्सक महणून सेवा देतात. दिनांक 28 जुलै रोजी वणी येथील भाग्यश्री नरेंद्र बुजाडे या महिलेची येथील ग्रामीण रुग्णालयात प्रसूती झाली. प्रसूतीनंतर जन्मास आलेल्या बाळाच्या पोटावर नाभीच्या ठिकाणी मांसाचा गोला दिसून आला. तसेच नवजात बाळाच्या शौच व लघवीचे करण्याचे अवयवसुद्धा विकसित झालेले नसल्याचे निदर्शनास आले. प्रसूतीपूर्व दिनांक 22 मे 2023 रोजी सदर महिलेची लोढा हॉस्पिटल मधील सरकारमान्य सोनोग्राफी केंद्रावर साधी सोनोग्राफी करण्यात आली होती. त्यामुळे गर्भातील बाळाच्या शारीरिक विकाराबाबत डॉ. लोढा यांनी पालकांना माहिती दिली नसल्याचा आरोप करून नवजात बालकाच्या वडिलांनी वणी पोलीस ठाण्यात व जिल्हा शल्य चिकित्सक यवतमाळ यांच्याकडे डॉ. लोढा यांची तक्रार केली. तसेच सोशल मीडियावर नवजात बालकाच्या फोटोसह डॉ. लोढा यांच्या निष्काळजीपणामुळे बालकाच्या जिवावर असा प्रसंग बेतल्याची पोस्ट व्हायरल केली जात आहे.
दि. 4 जुलै रोजी वणी येथील माजी नगरसेविका प्रीती बीडकर यांनी विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन डॉ. लोढा यांच्यावर आरोप केले. त्यानंतर डॉ. लोढा यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्यावर लावण्यात आलेल्या आरोपांबाबत खुलासा देखील केला. वणी ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफी मशीन उपलब्ध नसल्यामुळे लोढा मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलमधील सोनोग्राफी केंद्राला सरकारमान्य सोनोग्राफी केंद्राची परवानगी शासनाने दिली. ग्रामीण रुग्णालयातून रेफर केलेल्या गरोदर महिलेची सोनोग्राफी करण्यासाठी शासनाकडून त्यांना दर सोनोग्राफी 400 रुपये मिळतात. तर गरोदर महिलेकडून सोनोग्राफीचे कोणतेही शुल्क आकारले जात नाही. तसेच त्यांच्याकडे leval-1 सोनोग्राफी मशीन असून फक्त साधी सोनोग्राफी केली जाते. महिलेच्या सोनोग्राफी दरम्यान गर्भाशयामध्ये बाळ 22 आठवडयाचा असून विसंगती चाचणी (anomaly scan) साठी 3डी सोनोग्राफी केंद्रावर जाऊन सोनोग्राफी करण्याची सल्ला डॉ. लोढा यांनी महिलेला दिली. तसेच त्यांना रेफर लेटर देण्यात आले. मात्र महिलेनी anomaly scan सोनोग्राफी केलीच नाही व त्यानंतर प्रसूती होईपर्यन्त महिला परत तपासणीसाठी त्यांच्याकडे आलीच नाही. त्यामुळे नवजात बालकाच्या शारीरिक प्रकृती बाबत त्यांचा कोणताही दोष नाही. असा खुलासा डॉ. लोढा यांनी केला.