•2 गंभीर जखमी,दुचाकीस्वार घटना स्थळावरून पसार
देव नेवले,झरी: वणी मुकुटबन या मार्गावरील सीतारा बार जवळ तीन दुचाकींचा तिहेरी अपघात झाला आहे. या अपघातात दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अडेगाव येथील शिवा नामक तरुण (वय 28) MH-34 J6165 या दुचाकीवरून संध्याकाळी 7 वाजता मुकुटबन वरून अडेगावला जात असता. समोरून येणाऱ्या एका भरधाव अज्ञात दुचाकीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामुळे सदर दुचाकी दुसऱ्या एका दुचाकीला धडकली. या तिहेरी अपघातात प्रकाश कोल्हे (अंदाजे 50) हे गंभीररित्या जखमी झाले.
जखमींना तातडीने काही तरुणांनी त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले. मात्र प्रकाश याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला येथील वणी येथे रेफर करण्यात आले होते आणि शिवा नामक तरुणावर सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात आला परंतु अज्ञात दुचाकीस्वार घटना स्थळावरून फरार असून वृत्त लिहेपर्यत मुकुटबन पोलीस ठाण्यात कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही.