•खंडोबा-वाघोबा सभागृहात पार पडली सभा
सुरेंद्र इखारे,वणी:- आयोजन (८ऑक्टों) शनिवारी साय. ५ वाजता शहरातील खंडोबा-वाघोबा सभागृहात पार पडली .यामध्ये तालुक्यातील समाज बांधवानी सहभाग नोंदविला होता.यामध्ये समाजातील जेष्ठ रामरावजी काळे तर डाॅ.शांताराम ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.प्रमुख पाहुणे म्हणून प्रविण इंगोले,अशोक चौधरी ,डाॅ.शांताराम ठाकरे यांनी संघटनेच्या सुरुवातीपासून रोपट्याचे वटवृक्ष कसे झाले यासंदर्भातही माहीती दिली.
यावेळी सुनिल गोडे यांनी सुत्रसंचालनाच्या अगोदर ले.कर्नल आवारी यांना श्रध्दाजली देऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.प्रास्ताविक अशोक चौधरी यांनी संघटनेमध्ये आलेल्या अडचणी यांनी सभागृहात मांडल्या तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राजुभाऊ देवडे यांनी केले.
यामध्ये तिरळी कुणबी संघटनेची जुनी कार्यकारणी बरखास्त करुन,नवीन कार्यकारणी मध्ये अध्यक्षपदी कार्तीक देवडे तर सचिवपदी निलेश चौधरी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी सदस्य म्हणुन ज्योती ढाले,राहुल इंगोले,आशिष काळे,प्रशांत गोमकर,प्रफुल चौधरी, शुभम इंगळेसह महीलांचा सहभाग होता. सभेला शरद इंगळे, प्रशांत गोडे,संजय साखरकर, संतोष भेले,सुचित्रा गोडे,राजु साखरकर,शुभम इंगळे,प्रसाद ढालेसह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.