अजय कंडेवार,वणी:- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान मनुष्यबळ विकास कार्यक्रम अंतर्गत राज्यांतर्गत प्रक्षेत्र प्रशिक्षण दौऱ्याचे आयोजन केले जाणार आहे. तरी वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी लवकरात लवकर अर्ज करावे असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
इच्छुक शेतकऱ्याकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
फलोत्पादन व प्रक्रीया क्षेत्रात कार्यरत शेतकरी, प्रक्रीया केंद्राची प्रत्यक्ष माहिती घेण्यासाठी तालुक्यातुन 20 शेतकऱ्यांची निवड केली जाणार आहे. 20 शेतकऱ्याची निवड करतांना फळबाग लागवड, संरक्षित शेती, प्राथमिक प्रक्रिया केंद्र धारक व लाभ घेण्यास ईच्छुक शेतकरी व भाजीपाला लागवड करणारे शेतकरी यांची प्राधान्याने निवड करण्यात येणार आहे. अर्ज करणे करीता आपल्या गावचे कृषी सहाय्यक किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालय वणी येथे लवकरात लवकर अर्ज सादर करावा.
प्रक्षेत्र प्रशिक्षण दौऱ्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी फळबाग लागवड, कांदा चाळ, संरक्षित शेती, प्राथमिक प्रक्रिया इत्यादीचा लाभ घेतलेला आहे किंवा लाभ घेवू इच्छित असलेल्या शेतकऱ्यांना प्रक्षेत्र प्रशिक्षण अभ्यास दौऱ्यासाठी अर्ज करता येईल. शेतकऱ्यांनी अर्ज संबधित गावाच्या कृषी सहाय्यकामार्फत किंवा स्वत: तालुका कृषी अधिकारी कार्यालयास संपूर्ण माहितीसह अर्ज लवकरात लवकर करावा,असे आवाहन तालुका कृषी अधिकारी कार्यालय वणी मार्फत समस्त शेतकऱ्याना केलेले यांनी आहे.
“एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांचे प्रक्षेत्र प्रशिक्षण दौरा ठेवण्यात आला आहे तरी लवकरात लवकर शेतकऱ्यांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन -(तालुका कृषी अधिकारी कार्यालय, वणी)