Tuesday, February 17, 2026
HomeBreaking Newsतहसीलदार "ॲक्शनमोड"मध्ये ..... पण "तो खादाड"चलने दो चा "Mood" मध्ये......?

तहसीलदार “ॲक्शनमोड”मध्ये ….. पण “तो खादाड”चलने दो चा “Mood” मध्ये……?

"गाडी पकडो...चालक पकडो...मालक भगाओ" सध्या अशी स्थिती. •मग "त्या "मशिनवाल्यावर कुणाचा हाथ साहेब ?

Ajay Kandewar,Wani :- ६५० रुपयांत एक ब्रास रेती या संकल्पनेतून रेती डेपो उघडण्याची नौटंकी करणाऱ्या शासकीय यंत्रणांनी यंदा सध्यातरी कुठल्याही रेतीघाटांचा लिलावच केला नाही. त्यात राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी नव्या रेती धोरणाचे तुणतुणे वाजवून सर्व रेतीघाटांच्या लिलाव प्रक्रियेला स्थगीती दिली. एकप्रकारे रेती तस्करांसाठी सार्वजनिक मालमत्ता असलेल्या नद्या मोकळ्या सोडल्या. त्यातूनच वणी तालुक्यातील हा वर्धा नदीपात्रातील रेतीघाट तस्करांनी पूर्णतः पोखरून काढला आहे. ‘चोर, चोर मौसेरे भाई हा प्रकार सध्या रेतीतस्करी सुरु आहे. वणीत रेतीतस्कर व “तो खादाड” सध्या वेगळाच लपंडाव खेळत आहे.

मुळात अघोषितपणे रेतीतस्करीला काही स्वयंघोषित पांढरपेशी, “तो मोठा खादाड “व रेती चोरटे याची मिलीभगत कारणीभूत आहे. सत्ताधारी नेत्यांचे निकटवर्तीय किंवा गुन्हेगारी क्षेत्रातील नामचिन व्यक्ती या रेती तस्करीत उतरले आहे. महसूल अधिनियम अथवा पर्यावरणीय नियमानुसार वर्धा नदीपात्रातील होणाऱ्या बेसुमार रेती उत्खनन व चोरट्या वाहतुकीवर कारवाई होणे अपेक्षीत असते. नद्या ही सार्वजनिक मालमत्ता आहे. त्यामुळे या नद्यांच्या पात्रातील रेतीपासून शासनाला दरवर्षी मोठा महसूलही मिळतो.शासनाची तिजोरी भरण्याऐवजी या रेतीच्या माध्यमातून रेती तस्कर, प्रशासनातील अधिकारी मालामाल होत आहे त्यातही सर्वांत मोठा फायदा त्या “एका खादाड” होत आहे.त्याचा वाटा अगदी गुप्तपणे सर्वांनाच पोहोचतो आहेअशी मोठी चर्चा ही सूरू आहे.त्यामुळे या रेतीतस्करीवर मुळात कुणालाच कारवाई करायची नाही. फक्त गाड्या पकडायचा व चांगभल करायचं आणि मालक गेला चुलीत..पकडा चालकाला गाडीसोबत”अशी चर्चा जमकर सूरू आहे .एकंदरीत शासकीय महसुलाचे होणारे नुकसान हे जनतेसाठी मात्र अहीतकारक ठरत आहे.

तालुक्यात वर्धा नदीच्या पात्रात चालणारी रेती तस्करी वणी तालुक्यांत सर्वश्रुत आहे. सध्या वर्धा नदी पात्रातील रेतीघाटात  वणी तहसिलदारने एव्हढी मोठी कारवाई केल्यानंतर ही अहोरात्र उत्खनन सुरूच आहे. टूक, ट्रॅक्टर व टिप्परच्या सहाय्याने हजारो ब्रास रेती चोरून नेली जात आहे. मात्र महसूल यंत्रणा या रेती तस्करा कारवाई करत नाही. केवळ चुटपूट कारवाया करुन महसूल विभाग कर्तव्यपरायणता दर्शवित आहे.

•वणी तहसीलदार “ॲक्शनमोड”मध्ये…..

“या धडक कार्यवाहीनंतर 15 एप्रिललाही तहसीलदारांनी रेतीची अवैध वाहतूक करणारा एक हायवा ( MH 40-Y- 8991 ) पकडला. वणी वरोरा मार्गावरील टर्निंग पॉईंट बियरबार जवळ सापळा रचून तहसीलदारांनी चोरीची रेती वाहून नेणाऱ्या ट्रकवर कार्यवाही करून ट्रक तहसील कार्यालयासमोर लावला. मात्र हा ट्रक कोणत्या रेती घाटातुन रेती भरून आला, हे अद्याप अस्पष्ट असल्याची विश्वसनीय माहिती समोर येतं आहे.”

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments