Tuesday, February 17, 2026
HomeBreaking Newsतहसिलदार साहेब बघा हो .. भरदिवसा रेतीची अवैध वाहतूक ......

तहसिलदार साहेब बघा हो .. भरदिवसा रेतीची अवैध वाहतूक ……

•वणी महसुल दुर्लक्षित धोरणामुळे बुडतोय कोट्यवधींचा महसूल. •वणी पोलिसांची कारवाई,1 ट्रॅक्टर जप्त.

Ajay Kandewar,Wani:- तालुक्यात सुरू असलेल्या रेती चोरीकडे महसूल विभागाचे लक्ष नसल्याच्या बातम्या वारंवार प्रकाशित होत होत्या त्याची दखल घेत वणी पोलीसांनी जातीने लक्ष देत खळबळून जागा झाला परंतु वणी महसूल विभाग माञ स्वतःचा कामाचा बोंमा करून थातुरमातुर कारवाया सूरु आहे विशेषतः वणीत रेती तस्करीला आळा घालण्याचे काम महसूल विभागाचे असून वणी पोलीस ॲक्शन मध्ये येत  (दि.३०) रोजी वणी पोलीसांनी विठ्ठलवाडी येथे अवैध रेतीनें भरलेला 1 ट्रॅक्टर पकडला.

प्राप्त माहिती नुसार, वणी पोलीस पथक विठ्ठलवाडी या परिसरात कामानिमित्त गेले होते. दरम्यान पोलीस पथकाला विठ्ठलवाडी या रोडवर 1 ट्रॅक्टर येताना दिसले. या ट्रॅक्टरमध्ये रेती भरून होती. वणी पोलीस पथकाला संशय आल्याने त्यांनी ट्रॅक्टर थांबवत चालकाला रेतीच्या बाबतींत विचारणा केली. मात्र चालकाकडे रेती वाहतुकीचा परवाना नव्हता व विना क्रमांकाची गाडी होती. रेतीची अवैधरित्या वाहतूक होत असल्याचे लक्षात आल्यावर पथकाने ट्रॅक्टर एमएच 29 एम 4283 जप्त केले. घटनेचा पंचनामा केला. त्यात 1 ट्रॅक्टर व 1 ब्रास रेती अंदाजे किं.3लाख 6 हजार रु.चा माल मिळुन आला.सदर कार्यवाही वणी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक वणी याचे आदेशानुसार पोउपनि सुदाम आसोरे व पोलीस कॉन्स्टेबल अनिल यांनी केली

वणी महसूल अधिकाऱ्यांच्या कानडोळा…..

सध्या रेतीघाटांच्या लिलावावर स्थगिती आली आहे. मात्र तालुक्यातून रात्रीला अवाधरित्या रेती चोरी केली जात असल्याचे बोलले जात आहे. रेती चोरी मुळे जवळील वर्धा नदी आता गटार झाल्याचे दिसत आहे. रेती माफियांचा बंदोबस्त करण्याची मागणी पर्यावरण प्रेमी करीत आहेत.रेती साठवून जादा दरात विक्री तालुक्यातील अनेक ठिकाणी अवैधरित्या रेती साठवून ठेवल्याचे दिसत आहे. त्यामुळे साठवून ठेवलेली रेती कुणाची असा प्रश्न जनतेला पडतो. या साठवून ठेवलेल्या रेतीचा लिलाव करण्याची नितांत गरज आहे. रात्री जेसीबीच्या माध्यमातून ट्रकमध्ये भरून मोठ्या शहरात चांगल्या किमतीत ही रेती विकली जाते. अशात वणी महसूल विभाग सुस्त आणि काहीं खादाडामूळे तस्करांना आहारी जात असल्याच चित्रं आहे. तालुक्यातील नागरिकांकडून वणी महसूल विभागाचा कारभाराबाबत नाराजीचे सूर उमटू लागले आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments