•रेतीची चोरटी वाहतूक ट्रॅक्टर ताब्यात.
अजय कंडेवार,वणी:- तालुक्यातील कायर गावाजवळ असलेल्या विदर्भा नदी पात्रात अवैध रेती तस्करीत तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईमध्ये रेतीची विना राॅयल्टी वाहतूक करणारा 1 ट्रॅक्टर पकडला असता त्याच्याकडून जवळपास 5 लाख रु किमतीचा 1 ट्रॅक्टर व अर्धा ब्रास रेती असा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी (दि.19) दुपारी 11 वाजताच्या सुमारास करण्यात आली.
तलाठी व मंडळ अधिकारी पथक गस्तीवर असताना 19 डिसे रोजी कायर येथील विदर्भा नदीपत्रात अवैध रेती तस्करी जोमात सुरू असल्याची माहिती पठारपुर गावातीलच पोलीस पाटील यांनी मंडळ अधिकारी गजानन देठे यांना कळविले असता, कायर मंडळातील सर्व तलाठी व कोतवाल घटनास्थळी धाव घेतली असता,त्यांना विनाक्रमांकाचा ट्रॅक्टर दिसला. त्यांना संशय आल्याने ट्रॅक्टरची झडती घेतली. रेती चोरीची लक्षात आली व म्हणुन त्यांनी विनाक्रमांकाच्या ट्रॅक्टर ट्राॅली क्रं MH-29-BP-2959 या क्रमांकचे ट्रॅक्टर अर्धा ब्रास रेती सोबत जप्त करण्यात आले. या क्रमांकाचे ट्रॅक्टर मालक व चालक हे नवरगाव येथील विलास मोंडे यांचे असल्याचे माहिती पुढें आली.विदर्भा नदीपत्रातील अर्धा ब्रास रेती आढळून येताच, अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची तपासणी केली. ती रेतीची विनाराॅयल्टी वाहतूक असल्याचे स्पष्ट हाेताच उपस्थित तलाठी व मंडळअधिकारी यांनी रेतीसह ट्रॅक्टर जप्त केला.सदर ट्रॅक्टर तहसील वणी येथे जप्तीनामा लिहून सुपूर्द करण्यात आले.
सदरची कारवाई वरिष्ठांचा आदेशाने तलाठी किशोर ईरुटकर, तलाठी सचिन नेहारे, तलाठी आकाश डोहे,मंडळ अधिकारी म्हणून गजानन देठे सोबतच कोतवाल प्रफुल लोडे, पवन पचारे, तुषार पावडे, जयस्वाल मेश्राम व पठारपुर पोलिस पाटील मांडवरकर हे उपस्थित होते.