▪️ M.L.A ला MNS चा 15 दिवसाचा अल्टीमेटम.
अजय कंडेवार,वणी:- सध्याच्या परिस्थितीत शेतात तूर, कापूस, चना, मिरची आणि याच बरोबर काही कडधान्ये शेतात आहेत. विशेषतः कापसाला हमी भाव मिळत नसल्याने येथील शेतकरी आता मिरची व अन्य पिकांकडे वळला आहे. परंतू या ही पिकाला पूरक पाणी मिळत नसल्याने हाती आलेले हे पीक अक्षरशः नष्ट होत चालले आहे. वणी उपविभागात 17 कोळसा खाणी आहे बहुतांश कोळसा हा वीजनिर्मिती साठी वापरला जातो. तरी सुद्धा येथील जनतेला आणि शेतकऱ्यांना सुरळीत वीज देखील मिळत नाहीं. यापेक्षा मोठी शोकांतिका कोणती? आणि स्थानिक आमदार यांच लक्ष नेमक कूठे असा सवाल मनसे नेते राजु उंबरकर यांनी ता.25 ऑक्टोंबर रोजी,सकाळी 11 वाजता शिवमुद्रा जनसंपर्क कार्यालय, नांदेपेरा रोड, वणी या ठिकाणी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून केला आहे.विशेषतः यापुढे जर कोणत्याही शेतकऱ्यांने विजेच्या अभावी आत्महत्या केली तर आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा व येत्या १५ दिवसात शेतकऱ्याच्या विज पुरवठयाच्या मुद्याला सुरळीत करण्याची मागणीही या पत्रकार परिषदेत मनसे नेते राजू उंबरकरांनी केली. जर आमदाराने समस्या सोडविण्याकडे लक्ष दिले नाही तर शेतकरी हितार्थ मनसे मोठया प्रमाणात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार असल्याची माहिती दिली आहे.
पिकांच्या सिंचनासाठी महावितरण कडून ८ तास विद्युत पुरवठा देण्यात येतं असल्याचे सांगण्यात येते. मात्र हा पुरवठा कधी चालु कधी बंद होते,याचा कुठलाही नेम नाहीं. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्री बे रात्री शेतात जाव लागत. तर मतदारसंघांतील अनेक जागी ट्रान्सफार्मर नाही. मान्यता मिळून सुध्दा विभागांत उपकेंद्र आलेले नाहीत.त्यामुळे शेतकऱ्यांना विजेचे कनेक्शन अद्याप ही नाहीं. २०१८ साली पासुनचे अर्ज अद्यापही धूळखात पडलेले आहे. तर मागील ५ वर्षांतील एकाही अर्जदाराला नवीन विद्युत जोडणी झालेली नाही. वणी मतदारसंघात दौरा करत असताना प्रत्येक गावात लोकांशी साधलेल्या संवादात विजेचा गंभीर प्रश्न समोर येतं असल्याची माहिती उंबरकर यांनी दिली.
वणी विधानसभेत गेल्या १० वर्षापासून भाजपाची सत्ता आहे. केंद्रात आणि आता राज्यात भाजप सत्तेत आहे. तरी सुद्धा शेतकऱ्यांच्या पिकाचे पिकविमे, पुरपिडी मदत अजूनही मिळालेली नाही. तर मातोश्री पांदण रस्ता योजनेतून बहुतांश गावात ही पांदण रस्ते झालेले नाही. मतदारसंघात अनेक विभागातील पदांचा कारभार प्रभारावर आहे. याचा त्रास सामान्य जनतेला होतो त्यामुळे आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमक्रम पावित्रा घेणार असुन येत्या दर आठ दिवसाला आमदारांच्या कामाची पोलखोल आणि जनतेचे प्रश्न घेऊन आपल्या समोर येईल व याच बरोबर पुढील १५ दिवसात शेतकऱ्याच्या विज पुरवठयाच्या मुद्द्याला घेऊन शेतकरी हितार्थ मनसे मोठया प्रमाणात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार असल्याची माहिती यावेळी मनसे नेते राजु उंबरकर यांनी या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी मनसेचे वणी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, शहराध्यक्ष शिवराज पेचे ,मारेगाव तालुकाध्यक्ष रुपेश ढोके, शहराध्यक्ष चांद बहादे, झरी तालुकाध्यक्ष गजानन मिलमिले, अजिद शेख , पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.