•3 आरोपी पोलिसांच्या जाळ्यात 2 फरार
प्रकाश खिल्लारे, पुसद:- पुसद शहरातील लक्ष्मी नगर येथील एका झाडाच्या आडोशाला दि.27 डिसें 23 रोजी मध्यरात्री दरोडा टाकण्याच्या असलेल्या 5 जणांना संशयास्पद डीबी पथक पेट्रोलिंग दरम्यान पाहिले असता पथकाला संशय आला.दरम्यान पाच जणांना विचारपूस करण्यासाठी प्रयत्न केला असता ,यातील 2 आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले आहे.तर 3 आरोपी पोलिसांच्या जाळ्यात आले आहे.तीन आरोपीकडून 14 मोबाईलसह दरोडा टाकण्याच्या साहित्य व एक विना नंबरची दुचाकी देखील जप्त केली आहे.पाच जनाविरोधात शहर पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमाने गुन्हे दाखल झाले असून दोन फरार आरोपींचा शोध शहर पोलिसांच्या डिबी पथकाकडून घेतल्या जात आहे.
अनिल नागोराव ढगे वय ३५ वर्षे रा.शिवाजीनगर (आंबेडकर वार्ड), नांदेड,मोहम्मद शकील मोहम्मद इब्राहिम वय ४५ वर्षे रा. खडकपुरा, नांदेड व शेख मोहसीन शेख अहमद ३२ वर्षे रा.जनता न्यू आबादी शिवाजीनगर,नांदेड असे अटक केलेले आरोपींची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार शहर पोलीस स्टेशनचे डिबी पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे व त्यांची टीम गस्तीवर होते.अशावेळी लक्ष्मी नगर बोरगडी रोडवरील एका फर्निचरच्या गोदामा समोरील झाडाच्या आडोशाला पाच अनोळखी संशयास्पदरित्या हालचाल करीत असल्याचे दिसून आले.
अशावेळी सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज अतुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार उमेश बेसरकर यांच्या सूचना देऊन सुचनेचे पालन डिबी प्रमुख पोलीस उपनिरीक्षक लोहकरे यांनी प्रफुल इंगोले,अतुल दातीर, दिनेश सोळंके,मनोज कदम, आकाश बाभुळकर,शुध्दोधन भगत, वैजनाथ पवार व चालक सुनील ठोंबरे यांच्यासह वसंतनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार मुन्ना आडे, संजय पवार यांच्या मदतीने पाच जणांना पकडण्याचा प्रयत्न केला होता.अशावेळी दोन जण फरार होण्यात यशस्वी झाले तर तीन आरोपींना पकडण्यात यशस्वी झाले आहेत.ती आरोपींकडून चोरीचे तब्बल १४ मोबाईल, चोरीची एक विना नंबरची दुचाकी,दोन चाकू,एक लोखंडी कोयता,एक आरी पत्ता,एक लोखंडी रॉड,मिरची पावडर, लोखंडी पकड व एक २२ फूट लांब दोरी असे दरोडा टाकण्याचे साहित्य त्यांच्याकडून आढळून आले.डीपी पथकाने पकडलेल्या साहित्याची जवळपास १ लाख ४१ हजार ६५० रुपयाचा मुद्देमाल जप्त केल्याचे सांगितले आहे.
आरोपी या अगोदरही दरोडा टाकण्याच्या प्रयत्न होते …..
शहर पोलीस ठाण्याच्या डिबी पथकाने अनिल ढगे,मोहम्मद शकील व शेख मोहसीन या तीन आरोपीला पकडले असता त्यांची कसून चौकशी केली.त्यांच्या विरोधात अगोदर देखील नांदेड जिल्ह्यात चोरीचे एकूण तीन गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे.तर हिंगोली जिल्ह्यात देखील त्यांच्या विरोधात दोन चोरीचे गुन्हे दाखल झाल्याचे उघडकीस आले आहे.तर एक नांदेड जिल्ह्यात दरोडा टाकण्याच्या पूर्वतयारीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती ठाणेदार उमेश बेसरकर यांनी दिली आहे.