•उद्या शहरात निघणार विद्यार्थी-पालकांचा मुकमोर्चा.
•राजकीय व्यवस्था चिरीमिरीत दंग असल्याने चिमुकल्यांचे भविष्य धोक्यात.
अजय कंडेवार,वणी’:- सध्या गुणवत्तेत अग्रस्थानी असलेल्या सुंदरनगर येथील शाळा स्थलांतर करण्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सदर शाळा ही वणी तालुक्यातच असायला हवी, असे जाणकार, पालक विद्यार्थी करीत आहे. मात्र राजकीय,व वेकोलीचा दबाव असल्याचे बोलल्या जात असल्याने उद्या २४ ऑगस्ट ला वणीत विद्यार्थी व पालक मुकमोर्चा काढणार आहे. यात मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित जोपासून ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.
शहरातील वसंत जिनिंग सभागृहात २२ ऑगस्ट रोजी पालकांनी एक पत्र परिषद आयोजित केली होती. प्रसंगी पालकांच्या वेदना आणि त्यांच्या पाल्यांचे भविष्य कसे असेल असा मुद्दा समोर आला होता. सदर शाळा चंद्रपूर जिल्ह्यात स्थलांतर होत असताना शेकडो विद्यार्थ्यांना नाहक त्रास होणार हे सुद्धा समोर आले. जेव्हा वेकोली क्षेत्रात शाळा उभारण्यात आली तेव्हा वेकोलीच्या वणी उत्तर क्षेत्राने परवानगी बहाल केली होती असे म्हणणे आहे.
मात्र यात राजकीय दबाव असल्याची स्पष्ट दिसून आले आहे.येथील राजकीय व्यवस्था चिरीमिरीत दंग असल्याने चिमुकल्यांचे भविष्य धोक्यात आल्याचे स्पष्ट होते आहे. आता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याकडे लक्ष पुरवून विद्यार्थ्यांना न्याय देणार का ?हे बघणे महत्वाचे आहे