पोलिसांचा अनेक कारवाया संशयाच्या भोवऱ्यात
अजय कंडेवार, वणी – वणी या ऐतिहासिक व सांस्कृतिक शहरात मोठ्या प्रमाणात जुगाराचा खेळ सुरू झाला आहे. या जुगारातून अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. जुगाराने व्यसनाधीन झालेला जुगारी कुना कडून ना कुणाकडून किंवा बँकेच्या दारात जाऊन कर्ज काढून जुगाराच्या खेळात पैसे लावून संसार उध्वस्त करीत आहे .
वणीत चाललेल्या जुगाराचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी फक्त नाममाञ कमर कसली आहे. त्यामुळे वणी पोलिसांनी जुगाऱ्यांवर धाडी टाकून जुगारांतर्गत गुन्हे दाखल करीत आहे त्यावर तोडी करीत असल्याची खमंग चर्चा आहे , तर काही प्रतिष्ठित जुगार्यांच्या जुगारावर धाड टाकून त्या प्रतिष्ठीताना वाचविण्याचा प्रयत्न सुद्धा कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांकडून होताना दिसत आहे. इतकेच नव्हे तर मागिल लालपुलिया येथे एका भव्य जुगारातील मोठी रु मुद्देमाल न दाखवता केवळ 13 हजार रु अल्पशी प्रमाणात रोख रक्कम दाखवून विशाल रक्कमेची सेटिंग झाल्याची चर्चाही नागरिकांतून होत आहे. कारण त्या धाडीतील वाहने, मोबाईल, अन्य साहित्य गेले कुठे ? खरचं त्यांचाकडे साहित्य नव्हते का?अशी जनसामान्य चर्चा आहे.या धाडीत विशेष आशीर्वादही मिळाल्याची खमंग चर्चा सुरू आहे.
मध्यंतरी एका बार मध्ये जुगार सुरू असताना पोलिसांनी धाड टाकून बराच कालावधी लोटून सुध्दा जुगाऱ्यांवर गुन्ह्याची नोंद सुद्धा करण्यात आली नव्हती कारण त्या जुगारात प्रतिष्ठीतांचा सहभाग असल्याची चर्चा संपूर्ण शहरात होती व पोलिसांकडून माहिती मिळत नव्हती असा प्रकार वणी शहरात पोलिसांनी करवी सुरू आहे. त्यातही गरिबांचे नावे जुगार व अन्य धाडीत दाखविता असाही प्रश्न वणी पोलिसांचा कर्तव्यावर आला होता. शेवटी त्याचेही खापर पत्रकारावर फोडण्यात आले होते. असा भोंगळ कारभार वणी ठाण्यात सुरू आहे . विशेष “चिटोरे चाटोरे…अथांग सागरातले मासरी सुद्धा” हि मस्त मलाई खात असल्यांचेही दिसुन येत आहे.त्याकडे आवर्जून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असताना भर दिवसा एका महिलेचा गळ्यातील सोनसाखळी हिसकावून चोरटे पळून जातात त्यातही गून्हा दाखल करीत असतांना भा.द.वी 392 कलमानुसार न भा.द.वी 379 कलमाचा वापर करून गुन्हा नोंद करण्यात आला.यातच चोरट्यांना देखील पोलिसांकडूनच बळ मिळत असल्याचे नागरिकांकडून असेही बोलल्या जात आहे की, पोलिस ठाणे ” मे अपनी मन मानी साहाब……” तसेच मागील एका 376 चा प्रकरणात काही अशीही बोंब होती की आरोपी पडून गेला त्यातही काहीं थांग पत्ता नाहीं लागला असे भोंगळ कार्य ठाण्यात सूरु आहे.असे प्रकरण जसे चोऱ्या, जुगार वाहतुकीची समस्या एक ना अनेक प्रश्न नागरिकांसमोर असताना त्या समस्यांची सोडवणूक पोलीस विभागांकडून होताना दिसत नाही. असे नागरिकांतून बोलल्या जात आहे.मात्र पोलीस सावज शोधण्यासाठी शहराच्या बाहेर रस्त्यावर उभे असतात व शहरातील कायदा व सुव्यवस्थेकडे दुर्लक्ष का ? त्यांचा कार्यप्रणालीवरही प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे?असा प्रश्न उपस्थित होऊन नागरिकांत संशय व्यक्त होत आहे. तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष घालून काय ते सत्य बाहेर आणावे अशी सर्वसामान्य नागरिकांच्या नित्याच्या समस्या सोडवाव्यात अशी अपेक्षा केली आहे.