•शिरपूर पोलिसांचे कौतुकास्पद कार्य.
अजय कंडेवार,वणी:- शिरपूर पोलीसस्टेशन अंतर्गत असलेले पूरड गावात 24 ऑगस्ट रोजी पूरड येथे भर दिवसा घरफोडी करणाऱ्या दोन चोरट्यांना शिरपूर पोलिसांनी जेरबंद केले व त्याच्याकडून दीड लाखाचा वर रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता.त्यात अमोल सोमेश्वर भटवलकर (वय 32 वर्षे ) व प्रफुल देवीदास मोहीतकर (वय 26 वर्ष) दोन्ही रा. पुरङ ता. वणी जि. यवतमाळ असे अटक केलेल्यांची नावे होती.या दोन्हीं आरोपींनी भर दिवसा घरफोडी करुन चोरी केलेला सोन्याचे दागिने व 12000 हजार नगदी असा एकूण 1 लाख 97 हजार रु किमंतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता.देवराव मारुती थेरे (वय 35 वर्ष) रा. पुरड(नेर) ता. वणी जि. यवतमाळ हा एक गरीब घरातील शेतकरी… हा राब राब करून पैसा घरी ठेवायचा . दिनांक 24 ऑ. रोजी जेव्हा देवराव घरी आला तेंव्हा अज्ञात चोरट्याने दाराचे कुलूप तोडून बेडरुम मधील लोखंडी कपाटातून सोने चांदीचे दागिने तसेच नगदी 15 हजार रु. चा मुद्देमाल चोरट्याने लंपास केल्याचे कळले असता त्याने रितसर तक्रार पो.स्टे शिरपुर येथे दाखल करून विविध कलमांतर्गत अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता. परंतू शिरपूर पोलीसांनी पुरड परिसरातीलच 10 ते 12 संशयीतांची सखोल कसून चौकशी केली असता अवघ्या काही तासातच ठाणेदार गजानन करेवाड यांचा कारकीर्दीत गुन्ह्यांचा छडा लावण्यात यश आलें होतें आणि पुढील तपास अधिकारी म्हणून PSI रामेश्र्वर कांडुरे व अनिल सुरपाम कडे सोपविण्यात आले होते. पुरड गावातील शेतकरी देवराव मारुती थेरे यांचा चोरीला गेलेला मुद्देमाल शिरपूर पोलीसांनी 100 टक्के रिकवरी करून तपासाअंती दि.22 सप्टेंबर रोजी न्यायालयाचा आदेशाने DYSP गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात शिरपूर ठाणेदार संजय राठोड यांच्या विशेष उपस्थितीत PSI रामेश्र्वर कांडुरे व शिरपूर पोलीसांनी सुपूर्द केला.