•इसम जागीच ठार
अजय कंडेवार,वणी:- कोळसा भरलेल्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने 50 वर्षीय मृत इसम संजय गोयनका यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना काल दिं 7 मे रोजी रात्री 11 च्या दरम्यान वणी – मुकुटबन मार्गावर घडली.
संजय शिवभगवान गोयनका वय 50 वर्ष असे अपघातात मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. लालपुलीया येथील कोळसा डेपोमधील काम करून संजय गोयनका हे रात्री घराकडे दुचाकी वाहनाने परत जात असताना अचानक मुकुटबन मार्गावरून विरूध्द दिशेने भरधाव ट्रक क्रमांक MH-29-BE- 6155 याने दुचाकीला जबर धडक दिली. त्यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला .
वणी पोलिस स्टेशनला माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले व मृतदेह ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांना स्वाधीन करण्यात येणार आहे.