देव येवले,झरी (वा): तालुक्यातील 4 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजला असून उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर प्रत्यक्ष रणधुमाळीलासुद्धा सुरुवात झाली आहे. सरपंचपदाची निवडणूक थेट जनतेतून करण्यात येत असल्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी एकही ग्रामपंचायत अविरोध झाली नाही. यामुळे अविरोध निवडणुकीची काही ठिकाणची परंपरा सरपंचपदाच्या थेट निवडणुकीमुळे मोडीत निघाली आहे.
झरी तालुक्यात १८ डिसेंबर रोजी चार ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहे. ह्या निवडणुका विविध पक्षाच्या दिग्जाच्या गावात असल्याने, या नेत्याची प्रतिष्ठा पणाला लागल्याची चर्चा तालुक्यात रंगत आहे. दुर्भा, सतपल्ली टाकळी व वठोली ह्या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. प्रत्येक ग्रामपंचायत ७ सदस्य आणि १ सरपंच निवडून द्यावयचा आहे यासाठी २८ सदस्यासाठी ८० अर्ज तर ४ सरपंचाकरीता १६ अर्ज आले आहेत, दुर्भा आणि वठोलीत सरपंच पदाची एकास एक लढत आहे. दरवेळी ग्रामपंचायत निवडणुकीत राजकीय पक्षांना वगळून पॅनलचे राजकारण लढल्या जाते. मात्र यावेळी राजकीय पक्षांनी थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत उडी घेतल्याने गाव पातळीवरील राजकारण ढवळून निघाले आहे.
राज्यात शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी तसा ग्रामीण भागातील राजकारणात राजकीय पक्षांचा प्रवेश होणार असल्याचे निश्चित झाले. यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीनंतर गावा- गावांत अंतर्गत वाद वाढण्याचीही शक्यता वाढली. .
त्यामुळे बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये अपवाद वगळता दोन पॅनलमध्येच लढती पाहावयास मिळतात. सरपंचपदाची निवडणूक थेट जनतेतून असल्याने मात्र सरपंचपदासाठी वेगळे आणि सदस्य पदासाठी वेगळे राजकारण बघायला मिळत आहे.