•जनता निवडणार थेट 8 सरपंच.
देव येवले ,झरी प्रतिनिधी: तालुक्यातील 8 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यामध्ये माथार्जुन, शिबला, निमणी, अडकोली, खरबडा, दाभा, हिवरा – बारसा, या गावाचा समावेश आहे. या निवडणुकीत थेट सरपंचपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी 18 सप्टेंबरला मतदान पार पडेल. ही निवडणूक जास्त महत्त्वाची आहे. कारण राज्यात महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर सरपंचपदाची निवड ही थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक प्रतिष्ठीतांची प्रतिष्ठा पनाला लागली आहे. या निवडणुकीत बहुतांश गट ग्रामपंचायत असल्याने छोट्या गावावतील आप्त स्वकीय एकमेकांच्या विरोधात उभे थाटले आहे. सरपंच हा आपल्याच पॅनल चा असावा यासाठी मोठया प्रमाणावर गावा- गावांत मोर्चे बांधणी सुरु आहे. सरपंच हा थेट जनतेतून निवडून आणायचा असल्याने मुख्यता या पदासाठी सर्व पॅनल जोर देत असल्याचे चित्र दिसत आहे.
विकास कामाचे मुद्दे बाजूला सारून विविध प्रलोभनाचे खैरात मतदाराच्या पदरी पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या निवडणुका पक्षीय चिन्हावर लढविल्या जात नसल्या तरी ग्रामपंचायत आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी प्रत्येक पक्ष प्रयत्न करीत आहे. त्यामुळे त्यादृष्टीने सर्वच पक्षांचे प्रयत्न सुरू झाले असून, आता या निवडणुकीच्या अनुषंगाने तालुक्यात रणसंग्राम रंगणार आहे