•कुठे गड आला पण सिंह गेला, तर कुठे या उलट प्रतिक्रिया
देव येवले,झरी :- राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच निवडणुका पार पडल्या नंतर. आज तहसील कार्यालय येथे तालुक्यातील आठ ग्रामपंचायतीत निवडणुकीचा निकाल घोषित करण्यात आले. तालुक्यात पहिल्यांदाच सरपंच पदासाठी थेट निवडणुका असल्याने चुरशीच्या लढाया पाहण्यास मिळाल्या. यामध्ये दोन पुरुष तर सहा महिलांनी निवडणुकीत बाजी मारली आहे. विजयानंतर विजयी उमेदवाराने तहसील समोर गुलाल उधळून जल्लोष साजरा केला आहे.
तालुक्यातील निवडणुका जाहीर झाल्यापासून अनेकांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावत. निवडणूक रिंगणात उडी घेतली. थेट सरपंच पदासाठी निवडणूक असल्याने लढती सरळ सरळ प्रतिस्पर्धी एकमेकांविरुद्ध उभे ठाकले होते. आज निवडणुकीचे निकाल हाती येताच कुठे गड आला पण सिंह गेला, तर कुठे या उलट प्रतिक्रिया लोकांनी आनंद व्यक्त करत जल्लोष साजरा केला.
या निवडणुकीत विजयाची माळगळ्यात पडलेल्या उमेदवाराची नावे याप्रमाणे दाभा- शकुंतला व्यंकटराव कुळसंगे, खरबडा- गीता संतोष पुसाम, माथार्जुन- भगीरथ शंकर आत्राम, कारेगाव- सीताराम परसराम आडे, अडकोली- अशोक सीताराम पंधरे, निमणी- जिजाबाई नीलकंठ किनाके, हिवरा- चंदा दिनेश आत्राम, शिबला- रजनी दादाजी कोडापे. यातील बहुतांश निवडणुका महिला आरक्षित असल्याने अनेक भावी सरपंचांचा अपेक्षा धुळीस मिळाल्या असून, तालुक्यात बहुतांश ग्राम पंचायतीवर महिला राज प्रस्थापीत झाले आहे.निवडणूक निकालासाठी तहसीलदार गिरीश जोशी, नायब तहसीलदार महेश रामगुंडे, ए.सी. रामगुंडे ठाणेदार संगीता हेलांडे व इतर कर्मचारी यांनी व्यवस्थापन केले