• महिलांच्या रेकार्डब्रेक गर्दीत मारेगावात क्रांतीसुर्य ज्योती सावित्री महानाट्य संपन्न
नागेश रायपूरे,मारेगांव:- ज्या काळात महिलाना शिक्षणाचा अधिकार नव्हता त्या मनुवादी व्यवस्थेचा विरोध झुगारून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाचे दारे उघडे केले. व आज राष्ट्रपती पासून अनेक क्षेत्रात महिला भरारी घेत महत्वाच्या पदावर आहे. त्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले मुळेच मला आमदार होता आले. असे वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी मारेगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त आयोजित “क्रांतीसुर्य ज्योती सावित्री” या महानाट्याचे उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन केले .
लोकजागृती संस्था चंद्रपूर निर्मित क्रांतीसुर्य ज्योती सावित्री ह्या तीन अंकी महानाट्याचा प्रयोग क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्य ३ जानेवारीला मारेगावात जनहित कल्याण संघटना , क्रांतीयुवा संघटना व ग्रामिण पत्रकार संघटनेच्या वतीने आयोजीत करण्यात आले होते.या कार्यक्रमास उत्फुर्स प्रतिसाद देत महिला वर्गाने रेकार्डब्रेक गर्दी केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्डॉ प्रा. विभा पोटदुखे होत्या तर विचारपिठावर प्रमुख उपस्थिती माजी जि प सदस्या अरुणा खंडाळकर, एकविरा महिला बॅंकेच्या अध्यक्षा किरण देरकर, नगरसेविका अंजूम शेख, माजी नगराध्यक्षा इंदु किन्हेकर, माजी नगराध्यक्षा रेखा मडावी माजी पंचायत समितीच्या सभापती शितल पोटे, वनोजादेवी येथील सरपंचा डिमन टोंगे, मुख्याधिपिका सुषमा काळे प्रामुख्याने उपस्थित होत्या.
जनहित कल्याण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा यशस्वी उद्योजक गौरीशंकर खुराणा यांच्या संकल्पनेतुन तळागाळातील महिलांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षमय जीवनपट माहिती व्हावा यासाठी समाजात जागृतीची मशाल पेटवणारे “क्रांतिसूर्य ज्योती सावित्री” या महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जनहितच्या अध्यक्षा कविता मडावी, उपाध्यक्षा मिना दिघाडे, सचिव सुवर्णा खामणकर, सुनिता कुडमेथे, मंगला आसेकर सह आदी जनहित कल्याण महिला संघटनेच्या आदी सदस्य, क्रांती युवा संघटना व ग्रामीण पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्याचे विशेष सहकार्य लाभले, क्रांतीसूर्य ज्योती सावित्री या महानाटकाचा पंचक्रोशीतील रसिकानी वैचारीक आस्वाद मिळाला, कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सारीका गारघाटे यांनी केले तर आभार विजया कांबळे यांनी मानले .