•एकजुट कायम ठेऊन लढा यशस्वी करण्याचे आवाहन- कॉ. कुमार मोहरमपूरी
अजय कंडेवार,वणी :- जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी शिक्षकांनी थेट सरकार विरोधात डोक्यावर टोपी घेत शिक्षक, शिक्षकेतर, सरकारी व निमसरकारी कर्मचारींनी जुनी पेन्शनची मागणी केली. आज संपाच्या सातव्या दिवशी सोमवार (दि.20 मार्च ला)” राजूर बचाव संघर्ष समितीने” या आंदोलनात सहभागी होऊन संपाला जाहीर पाठिंबा दिला.
कॉ. कुमार मोहरमपुरी म्हणाले, कर्मचार्यांच्या भावना सरकारपर्यंत पोहचलेल्या आहेत. मात्र अद्यापपर्यंत सरकारने हा विषय सकारात्मकपणे चर्चेला घेतलेला नाही. शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलवलेले नाही. सरकारने सकारात्मक पाऊल टाकले नसल्याने लोकशाही मार्गाने शिक्षक व कर्मचार्यांचे जुनी पेन्शनसाठी बेमुदत संप सुरू आहे. सरकारने आंदोलकांच्या तीव्र भावनांचा विचार करावा. काही राजकीय मंडळी प्रमुख विषयापासून मन भरकटविण्यासाठी इतर मुद्दे उपस्थित करुन आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न करतील. मात्र सर्व शिक्षक, कर्मचारी यांनी आपली एकजुट कायम ठेऊन लढा यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
तर या आंदोलनास राजूर बचाव संघर्ष समीतीने पाठिंबा जाहीर केला. अनेक शिक्षकांने डोक्यावर जुनी पेन्शन मागणीची टोपी परिधान करुन सरकारचा निषेध नोंदविला. यावेळी शिक्षक आंदोलकांनी जुनी पेन्शनसाठी जोरदार घोषणाबाजी केली. तर महिला शिक्षिकाही आंदोलनात सहभाग नोंदविला. सरकारने तातडीने जुनी पेन्शन योजना लागू करावी. सरकारने आंदोलकांचा अंत पाहू नये, अन्यथा सर्व शिक्षक, शिक्षकेतर व सरकारी कर्मचारी सरकारला जाब विचारल्याशिवाय राहणार नसल्याचे यावेळी संतप्त भावनाही शिक्षकांनी व्यक्त करण्यात आल्या.
यावेळी संघदिप भगत, अशोक वानखेडे, सरपंच विद्या डेवीड पेरकावार,कुमार मोहरमपुरी , मो.अस्लम ,प्रकाश तालावार,रियाजुल हसन,अनिल डवरे,अशफाक अली, नंदु लोहकरे, मो.खुशनूर, मतीन शेख, एतेशाम अली, महेश लिपटे ,अजय कंडेवार,जयंत कोयरे, सुशिल अडकीने, अँड.अरविंद सिडाम व ग्रामवासी उपस्थित होते.