•अनेक पालक झाले भावूक….
अजय कंडेवार,वणी:- तालुक्यातील भुरकी येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक गजानन निब्रड सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा सपत्नीक सत्कार करून व भेटवस्तू देऊन निरोप देण्यात आला.
उत्कृष्ट कामगिरी करून गेल्या अनेक वर्षात येथील जिल्हा परिषद शाळेतून गजानन निब्रड निवृत्त झाले. हा एक भावनिक क्षणच.खरच त्यांची आठवण सदैव राहील व त्यांचे संस्कार विसरणार नाहीत अशा शब्दात शिक्षक व अनेक पालकांनी आपल्या भावना प्रकट करीत त्यांचा सत्कार करून त्यांना 4 सप्टें.रोजी सपत्नीक सत्कार करून निरोप देण्यात आला. या निरोप कार्यक्रमात प्रथमतः थोर पुरुषांचे प्रतिमेला हारअर्पण करून अभिवादन करण्यात आले.पाहुण्यांचे स्वागत स्वागत गीतांनी ज्योती बदकी यांनी केले. शाळा व्यवस्थापन समिती च्या वतीने शिक्षक गजानन निब्रड सत्कार करण्यात आला.तर छबुताई निब्रड यांचाही सत्कार महिला समितीच्या वतीने करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष राम देऊळकर, प्रमुख पाहुणे म्हणून सीमा बदकी(सरपंच), गणेश निकोले(केंद्र प्रमुख),नामदेव बोबडे (केंद्र प्रमुख),विनोद दानव(उपसरपंच), हरीचंद्र बदकी, सचिन देऊळकर, दिनेश लोणारे,ज्योती बदकी,स्नेहल गाडगे,प्रसाद निब्रड,अनिता कुमरे,दिलीप बदकी(तंटामुक्ती अध्यक्ष),पी.वि.जीवने (सचिव) व लता झाडे(अंगणवाडी सेविका) हे सर्व उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक शिक्षक प्रकाश तालावार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल गाडगे यांनी केले तर आभार प्रदर्शन कोमल देऊळकर यांनी केले.