•”मीसिंग शोध “तपासात व्दितीय स्थान पटकाविले.
अजय कंडेवार,वणी:- यवतमाळ जिल्हा पोलीस दलात दर महिन्याला गून्हे परिषद घेतली जाते .जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.पवन बन्सोड व अप्पर पोलीस अधिक्षक पियुष जगताप रूजू होताच यांचा संकल्पनेतून 5 हेडखाली( मुद्देमाल निर्गीती,दोषसिद्ध, सीसीटेनिस, गुन्हे निर्गिती, मीसिंग शोध) यात सर्वात चांगली कामगिरी करणाऱ्या पोलीस स्टेशनला गौरविण्यात येते. त्यात तीन क्रमांक असतात प्रथम स्थानला चषक व प्रमाणपत्र देत असतात द्वितीय व तृतीय स्थानला प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येत असते. विशेष माहे सप्टें महिन्यात पी. आय. अजित जाधव यांच्या सूचनेनुसार वणी पोलिस हवलदार सचिन मडकाम व पोलिस शिपाई चौधरी यांनी एकूण 12 हरवलेले इसम त्यात (9 महिला 3 पुरुष) यांचा शोध घेतला विशेष यात दोन महिला या राजस्थान मधून शोधून आणले व यवतमाळ जिल्ह्यातून वणी ठाणे माहे सप्टें मध्ये “मीसिंग शोध”तपासात व्दितीय स्थान पटकाविल्याने दि.12 ऑक्टोबर रोजी अप्पर पोलीस अधीक्षक पियूष जगताप यांचे हस्ते वणी पोलिस स्टेशनचे पि.आय अजित जाधव व दोन पोलिस कर्मचारी यांना प्रशस्तीपत्र देत गौरविण्यात आले.
हा उपक्रम मागील अनेक महिन्यांपासून अतिशय उत्तमरित्या सूरु आहे. हा उपक्रम पोलिस दलाला बूस्टर डोजच म्हणायला हरकत नाही. पोलीस दलात उल्लेखनीय आणि कौतुकास्पद काम करणाऱ्या पोलीस ठाण्यांचे मूल्यांकन करण्यात आले होते. वणी ठाण्याने “मिसिंग शोध” तपासात द्वितीयस्थान पटकाविले. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अप्पर पोलीस अधीक्षक पीयूष जगताप, Dysp गणेश किंद्रे यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे वणी ठाणे कामगिरी करण्यात अग्रेसर ठरत आहे त्यात काहीं शंका नाही.
वणी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अजित जाधव व पोलीस कर्मचारी यांच्या कामगिरीबद्दल विशेष अभिनंदन देण्यात येत आहे. भविष्यात अशीच उल्लेखनीय कामगिरी करुन पोलीस दलाची प्रतिमा उंचावण्यात मोलाची कामगिरी कराल ही अपेक्षा व पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील सर्व अधिकारी उपस्थित होते.