• महाविकास आघाडीचा डंका……
अजय कंडेवार, वणी :- जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार मनिष पाटील विजयी झाले आहेत. काँग्रेसचे उमेदवार मनिष पाटील यांना 15, तर प्रतिस्पर्धी महायुतीचे उमेदवार राजुदास जाधव यांना अवघी 6 मते मिळाली.जिल्हा बँकेच्या या निवडणुकीने निवडणुकीत महाविकास आघाडी मजबूत असल्याचा संदेश दिला आहे.
जिल्हा बँकेचे अध्यक्ष टीकाराम कोगरे यांनी अविश्वासाचा ठरावाच्या हालचाली झाल्यानंतर 1 ऑगस्ट रोजी राजीनामा दिल्याने अध्यक्षपदासाठी ही निवडणूक 21 सदस्यीय जिल्हा बँकेत काँग्रेसकडे सर्वाधिक 9 संचालक आहेत. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे गटाकडे 3 तर शिंदे गट, शरद पवार गट आणि अजित पवार गटासह अपक्ष म्हणून प्रत्येकी दोन आहेत.
भाजपकडे अवघा एक संचालक असतानाही पक्षाने या निवडणुकीत अध्यक्षपदी महायुतीचा उमेदवार बसविण्याचा चंग बांधला होता. यासाठी पालकमंत्री संजय राठोड, भाजप आमदार मदन येरावार आणि राष्ट्रवादीचे आमदार इंद्रनील नाईक यांनी तगड़ी फिल्डिंग लावली होती. महाविकास आघाडीकडे पुरेसे संख्याबळ असतानाही संचालक फुटण्याची भीती असल्याने मोठी दक्षता घेतली जात होती. अखेर सोमवारी गुप्त पद्धतीने झालेल्या मतदानामध्ये काँग्रेसचे मनिष पाटील 15 मते घेवून विजयी झाले तर महायुतीच्या राजुदास जाधव यांना अघी 6 मते मिळाली.
या निवड प्रक्रियेत मनीष पाटील तर यांना निवड झाल्याचे प्रमाणपत्र नानासाहेब पवार चव्हाण यांनी दिले. यावेळी माजी प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी आम. यांनी वामनराव कासावर, आ.प्रतिभाताई धानोरकर,शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे जिल्हाअध्यक्ष राजेंद्र गायकवाड, संजय देरकर,राष्ट्रवादी जिल्हाअध्यक्ष शरद पवार गट वर्षाताई निकम, माजी आमदार विजयराव खडसे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रफुल्ल मानकर, काँग्रेसचे नेते प्रवीण देशमुख,अरविंद वाढोणकर, अरुण राऊत, अनिल गायकवाड, साजीद बेग, विलास राऊत, बाळासाहेब मांगुळकर, रवी ढोक, किरण कुमरे, राजु विरखेडे इत्यादी कॉंग्रेसचे नेतेमंडळी उपस्थित होते.