•सामाजिक, शैक्षणिक,क्रीडा क्षेत्र, सेवाभावी संस्था व इच्छुक रक्तदात्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन -(प्रदिप शिरस्कर, ठाणेदार,वणी )
अजय कंडेवार,वणी:– यवतमाळ जिल्हा पोलीस दलाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असुन या अनुषंगाने “वणी पोलीस स्टेशन येथील दक्षता हॉल” येथे दिनांक 16 मे 2023 रोज मंगळवारला सकाळी 8.00 ते 5.00 वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. Blood Donation Camp by District Police Force.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रम पोलीस दलातर्फे राबविण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये पोलीस विभागातील सर्व अधिकारी, अमलदार व त्यांचे कुटुंब सहभागी होणार आहे.शिबिराच्या यशस्वीतेसाठी सामाजिक, शैक्षणिक,क्रीडा क्षेत्र, सेवाभावी संस्था व इच्छुक रक्तदात्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पी. आय प्रदिप शिरस्कर यांनी केले आहे. सर्व सहभागी रक्तदात्यांना पोलीस विभागाला सहकार्य केल्याबद्दल प्रशंसापत्र दिले जाणार आहे.