•इतरत्र खर्चाला दिली बगल.
अजय कंडेवार,वणी :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वणी विधानसभा क्षेत्रातर्फे,(सामजिक न्याय विभाग, जिल्हा अध्यक्ष,) विजय नगराळे यांच्या नेतृत्वात दिवाळीत कोणताही इतरत्र खर्च न करता त्यांनी आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबासोबत आपली दिवाळी साजरी केली.
वणी तालुक्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबा सोबत दिवाळीचा फराळ, मिठाई, महिलांना साडी चोळी, व आर्थिक मदत देऊन त्यांचे सोबत राष्ट्रवादी वणी विधानसभा क्षेत्राच्या पदाधिकाऱ्यांनी दिवाळी साजरी केली. वणी तालुक्यात मागील वर्षी आठ ते दहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्या सर्वांच्या गावो गावी प्रत्यक्ष जाऊन घरी भेट देत “दिवाळी” साजरी केली. त्यात उज्वला वासुदेव मोहितकर तेजापुर, ज्योती संभू बद्कल पुरड(नेरड), बेबि सुरेश कालर, पळसोनी, राहुल रमेश शिकरे पळसोनी,सुनंदा किशोर येरगुडे मु, बाबापुर (कायर), यशोदा विजय नवले मु कायर (पिंपरी),अर्चना चंद्रशेखर धगडी, पिल्की वाढोणा, धनश्री मारोती पायघन मु.बोर्डा, मनीषा भारत गौरकर मु.मोहुर्ली यांच्या घरी जाऊन त्यांच्यासह मिठाई व साडीचोळी देऊन दिवाळी साजरी केली.
यावेळी सामाजिक न्याय विभाग, जिल्हा अध्यक्ष विजय नगराळे, रामकृष्ण वैद्य, विनोद ठेंगणे, गुणवंत टोंगे, बास्मवार व इतर पदाधिकारी उपस्थित होते.