•सरकारच्या धोरणाविरुद्ध आमदार रोहित पवार आक्रमक.
अजय कंडेवार,वणी : – आ.रोहित पवार यांच्या संघर्ष यात्रेत सामाजिक न्याय यवतमाळचे जिल्हाध्यक्ष विजय नगराळे यांच्यासह वणी विधानसभा क्षेत्राचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .यावेळी वणी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी, शेतमजूर आदींना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत विजय नगराळे यांनी पवार यांचाकडे साकडे घातले.
राज्यातील युवकांच्या बेरोजगारीवर,शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळण्याकरिता व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पिक विमा व आर्थिक मदत मिळण्याकरिता तसेच सरकारी शाळा बंद करण्याच्या सरकारच्या धोरणाविरुद्ध आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात युवकांचे प्रश्न घेऊन पद यात्रा काढण्यात आले.दरम्यान समस्येचा डोंगरच विजय नगराळे यांनी मांडलें.
या संघर्ष यात्रेमध्ये वणी विधानसभा क्षेत्रामधून राष्ट्रवादीचे सामाजिक न्याय यवतमाळ जिल्हाध्यक्ष विजय नगराळे ,वणी तालुका ओबीसी सेल अध्यक्ष गुणवंत टोंगे, यवतमाळ जिल्हा सरचिटणीस रामकृष्ण वैद्य ,इतर पदाधिकारी व कार्यकर्ते या पदयात्रेमध्ये देवगाव जिल्हा अमरावती येथून पुलगाव पर्यंत पदयात्रेत सामील झाले आहे. या पदयात्रेचा समारोप नागपूर येथे होणार अशी माहिती मिळाली.