•पण वणीत ठाणेदारांचा वॉच, पोलीसांचा तगडा बंदोबस्त.
अजय कंडेवार,वणी:- सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाचे उत्साहात स्वागत करण्यासाठी तालुक्यातील तरुणाई सज्ज आहे. यावेळी प्रत्येक चौका चौकात पोलिसांचा मोठा फौजफाटा तयार असणार आहे. मद्यपी वाहनचालकांवर कठोर कारवाई होणार आहे.थर्टी फस्टला झिंगाट नाचू नका, उपद्र प्रकार करू नका नाहीं तर याद राखा, मद्यपान करुन गाडी चालवू नका, कारण वणी पोलिसांची करडी नजर तुमच्यावर आहे. नियम मोडल्यावर नववर्षाच्या आनंदावर विरजण पडणार आहे. वणी ठाण्यांतर्गत पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. नाकाबंदी केली आहे. दंगा नियंत्रण, दामिनी पथकही सज्ज, वाहतूक प्रशासनही झाले आहे. विशेषतः ग्रामीण भागातही पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार आहे.
थर्टी फस्टची अनेक जण आतुरतेने वाट पाहत असते.यासाठी १५ दिवसांपासून तयारीही सुरू असते. हॉटेल्स, रिकाम्या जागा, क्रीडांगणे , खुले प्लॉट,आदी ठिकाणी वाद्याच्या तालावर नागरिक थिरकत असते. हॉटेलमध्ये तर या रात्री पाय ठेवायलाही जागा नसते. हॉटेल व मोक्क्याच्या ठिकाणी अनेकदा तर घराच्या स्लॅबवर डीजे लावून तरुण- तरुणाई थर्टी फस्टची पार्टी करतात. पूर्वी केवळ शहरापुरता असलेला थर्टी फस्ट आता ग्रामीण भागातही पोहोचला आहे.सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी ग्रामीण भागातील तरुणवर्ग शेतात पार्टीचे आयोजन करण्याच्या तयारीत आहे. तर अनेक तरुण शहरात आपल्या मित्राकडे पार्टीसाठी जाण्याच्या बेतात आहे.