नागेश रायपूरे, मारेगाव:- जळका येथील स्व.लक्ष्मीबाई मोघे विद्यालयात विधी सेवा प्राधिकरण, केळापूर यांचे वतीने नागरिक व विद्यार्थ्याकरिता जिल्हास्तरीय कायदेविषयक मार्गदर्शन व प्रबोधन शिबिर घेण्यात आले.यात विविध कायद्याबाबत विस्तृत माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केळापूर चे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच.एस. सातभाई हजर होते. प्रमुख अतिथी म्हणून वरिष्ठ दिवाणी न्यायधिश डाँ.त.न.कादरी,सह दिवाणी न्यायधीश के.एस.वानखेडे,जळका च्या सरपंच ज्योत्स्ना कुमरे,ठाणेदार राजेश पुरी,वरिष्ठ अधिवक्ता एड. के.जी.मुत्यलवार,एड. परवेज पठाण,एड.बिजेवार,एड.मनवर.उपसरपंच चंद्रशेखर मोघे,पोलीस पाटील विजय मोघे मंचावर उपस्थित होते.
याप्रसंगी एड.पेटेवार,एड.सैय्यद मुन्नवर,यांनी विविध कायद्याची माहिती दिली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक एस.एन. नाहाते यांनी केले.सूत्रसंचालन एड.के.एम.शेंडे ह्यांनी केले तर आभार प्रदर्शन एड. मेहमूद पठाण यांनी केले.
याप्रसंगी सरकारी वकील चैताली खांडरे, एड.गिलानी,एड. वंदना लोढा,एड.देठे, एड.सिद्धार्थ लोढा यांच्यासह मारेगाव, केळापूर येथील वकील मंडळी प्रामुख्याने हजर होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवेन्द्र पोल्हे,यांचेसह शाळेचे शिक्षक, कर्मचारी व मारेगाव, केळापूर येथिल न्यायालयीन कर्मचारी,पोलीस यांनी परिश्रम घेतले.