•वसंत जिनिंगची निवडणूक रंगात……
•या निवडणुकीत ‘विजय…’ची राहील ऐतिहासिक छाप
अजय कंडेवार, वणी :- येत्या 6 नोव्हेंबर 2022 रोजी होऊ घातलेल्या वसंत जीनिंगच्या17 संचालकांच्या निवडीसाठी 65 उमेदवार विविध पक्षासी संबधीत असून व पदाधिकारी आहे परंतु वसंत जिनिंगचे संचालक म्हणून आपले नशीब अजमवण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने आता निवडणुकीला रंग चढला आहे . वसंत जीनिंगच्या 17 संचालकासाठी ही निवडणूक होत आहे त्यामुळे राजकीय पक्षांनी आपापले पॅनल टाकून निवडणुकीत रंग भरला आहे. यामध्ये मुख्यतः काँग्रेस, भाजप, शिवसेना, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी संघटना, संभाजी ब्रिगेड, यांचा समावेश आहे .


परंतु प्रत्येक पॅनलचे नेतृत्व पक्षाचा प्रतिनिधी करीत आहे. त्यामुळे ही निवडणूक अस्तित्वाची झाल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. वसंत जीनिंगच्या विद्यमान संचालक मंडळाचे अध्यक्ष ऍड देविदास काळे यांचे जय सहकार पॅनल, काँग्रेस पक्षाचे वामनराव कासावार यांचे परिवर्तन पॅनल ,भाजप पक्षाचे विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोडकुरवार यांचे शेतकरी एकता परिवर्तन पॅनल तर विविध पक्ष संघटनेचे अनिल हेपट यांचे वसंत जिनिंग बचाव पॅनल असे चार पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले आहे .त्यामुळे वसंत जिनिंगवर आपले वर्चस्व राखण्यासाठी कंबर कसली असून येणाऱ्या काळात वसंत जीनिंगच्या अध्यक्षपदासाठी कोण बाजी मारेल हे येणारा काळ सांगेल त्यामुळे ऍड देविदास काळे यांनी आपले वर्चस्व कायम करण्यासाठी विविध राजकीय पक्षांचा विचार न करता वसंत जीनिंगच्या “विकासासाठीच” अशा संचालकांची निवड करून दमदार उमेदवारी दिली आहे.


त्यामुळे मतदारांचा कल मागे झालेल्या रंगनाथ स्वामी पतसंस्थेच्या निवडणुकीसारखी होऊन ऍड देविदास काळे यांच्या गळ्यात विजयाची माळ पडण्याची शक्यता बळावली आहे असे मतदारातून बोलल्या जात आहे. परंतु आता 6 नोव्हेंबर ला मतदार जय सहकराची घोषणा करेल त्यात काही तिळमात्र शंका राहणार नाही अशीही खमंग चर्चा आहे.

