•रणधुमाळीत चुरस , ‘विजय ‘…. ला ग्रामीण भागात पसंती
•वसंतच्या उज्वल भविष्यासाठी ‘ जय सहकार पॅनलची ‘ गरज ….. – मतदारराजा
अजय कंडेवार, वणी- येथील ‘ दि वसंत को ऑपरेटिव्ह शेतकरी जिनिंग प्रेसिंग फक्ट्री ची 6 नोव्हेंबर 2022 रोजी 17 संचालकासाठी निवडणूक होऊ घातली असून जय सहकार पॅनलच्या संचालक उमेदवाराच्या ताकदीवर वसंत जिनिंगच्या विकासाची धुरा अवलंबून आहे . परंतु या निवडणुकीत 65 उमेदवार विविध पॅनेलमध्ये उभे राहून आपले नशीब अजमावण्याच्या प्रयत्नात आहे त्यामुळे जय सहकार पॅनलच्या ऍड देविदास काळे यांनी आपले नेतृत्वात विरोधकांच्या तोडीचे उमेदवार या रणधुमाळीत उतरविल्याने चुरस निर्माण होऊन मत विभाजनाने ‘विजय’ १०० % जवळ आले आहे.
परंतु वसंत जिनिंगच्या 10 हजार 924 मतदारांचा कल सध्यातरी जय सहकार पॅनलच्या बाजूने असल्याने वसंत जीनिंगचे भविष्य उज्वल असणार आहे. आता निवडणूक चार दिवसांवर असून जय सहकार पॅनलचे सर्व संचालक उमेदवार निवडून येण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे .
त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे तेव्हा मतदारात उत्साहाचे वातावरण निर्माण होऊन जय सहकार पॅनलच्या प्रचाराच्या रणधुमाळीत उतरले आहे. त्यामुळे सहकार क्षेत्राचे पुरस्कर्ते ऍड देविदास काळे यांचा विजय निश्चित असल्याचे मतदारात बोलले जात आहे. त्यामुळे विविध पक्षाच्या उमेदवारांमुळे रणधुमाळीत चुरस दिसून येत आहे.