•जय सहकार पॅनलला जनता देणार झुकते माप.
•उद्याला सूज्ञ मतदारराजा दाखवेल विरोधकांना त्यांची जागा – विजय चोरडिया
अजय कंडेवार,वणी : एक वसंतचा नवीन इतिहास हा जय सहकार पॅनलच घडवून आणेल हे सत्य जनतेपासून लपलेले नाही. जनतेचा विश्वास व विकास साकारण्याचे काम ॲड. देविदास काळे यांचाच अध्यक्षतेखाली केले आहे व पुढेही करीत राहणार. विरोधक कितीही प्रचार करीत असले तरी जनता सुजाण आहे. असे मत जय सहकार पॅनलच्या उमेदवाराकडून व्यक्त होत आहे.
जिनिंगची यशस्वी वाटचाल करीत आज अनेक करोडो रुपयांचे उत्पन्नामध्ये मध्ये वाढ करण्यात यश मिळविले. हे विरोधकांना किती खुपले हे आम्ही सांगणार नाही विरोधकच स्वतःची कमी पणा करण्यात मग्न आहे त्यात काही शंकाच नाही. जय सहकार पॅनेलमध्ये अनुभवी उमेदवारांना सामील करण्यात आले आहे. ज्यामुळे संस्थेचा यापेक्षाही अधिक विस्तार करता येईल व विकासाची कास धरता येईल.
जनतेने नव्याने आलेल्या या विरोधकांना साथ न देता जय सहकार पॅनलच्या ” या बोधाचिन्हवर फुलीचा शिक्का मारून विजयी करण्याचे आव्हान पॅनलचे अधीकृत उमेदवार विजय चोरडिया यांचा तरफे समस्त मतदार राजा यांना करण्यात आले आहे. जिनिंगचा विकास जर हवा असेल तर जय सहकार पॅनलशिवाय पर्याय नाही. विरोधकांच्या खोट्या व फसव्या प्रचाराला बळी न पडता आपले बहुमूल्य मत हे जय सहकार पॅनललाच द्यावे. असे स्पष्ट मत विदर्भ न्यूज ला विजय चोरडिया यांनी दिले आहे.