•तर वंदना परसावत उपाध्यक्ष व सचिव जयप्रकाश सूर्यवंशी.
•नगरपालीका कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. या
पतसंस्थेची निवडणूक.
अजय कंडेवार,वणी :- नगरपालीका कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. या पतसंस्थेची निवडणूक दि. 12 फेब्रुवारी 2023 रोजी संपन्न झाली.या निवडणुकीत जयंत सोनटक्के यांची अध्यक्षपदावर अविरोध करण्यात आली तर वंदना परसावत उपाध्यक्ष व सचिव जयप्रकाश सूर्यवंशी यांची निवड झाली..Jayant Sontakke was elected unopposed to the post of President
या निवडणुकीत परिवर्तन पँनलचे भोलेश्वर ताराचंद, किशोर चौधरी, प्रेमदास डंबारे, विनोद चव्हाण, मुरलीधर ,कूत्तरमारे, जयप्रकाश सूर्यवंशी,सुनीता जकाते, वंदना परसावर, जयंत सोनटक्के,संजय पवार हे सर्व उमेदवार निवडून आले. जयंत सोनटक्के यांच्या नेतृत्वात एकतर्फी परिवर्तन पँनलचा दणदणीत विजय झाला.
नगरपालीका कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. या पतसंस्थेचे अध्यक्ष निवडणूक दि. 6 मार्च 2023 रोजी होती. या अध्यक्ष पदाकरिता स्वच्छ प्रतिमा,तडफदार व कार्यनिष्ट जयंत सोनटक्के यांच्याच एकमेव फार्म व उपाध्यक्ष पदाकरिता वंदना परसावत व सचिव पदाकरिता जयप्रकाश सूर्यवंशी यांचाही एकमेव फॉर्म आल्यामुळे अध्यक्ष ,उपाध्यक्ष व सचिव अविरोध निवडून आले. त्यांच्या या निवडीबद्दल अनिल कांबळे , किशोर परसावार, पालवे , शिंदे,जोगी यांचे मार्गदर्शन लाभले. अध्यक्ष पदावर जयंत सोनटक्के यांची निवड झाल्याबद्दल त्यांच्यावर नागरिकांचा शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.