•2 युवक अटकेत.
अजय कंडेवार,वणी:- शहरातील प्रगतीनगर येथील एक अल्पवयीन मुलाला दोघांनी केवळ दहा हजार रुपयांसाठी जबर मारहाण केली असता अल्पवयीन मुलाच्या आईने वणी पोलिस स्टेशन येथे ता.22 ऑक्टो.रोजी तक्रार नोंदविली. याच तक्रारीवरून वणी पोलिसांनी गुन्हा नोंद करून दोघांना अटक युवी मोगरे ( 24 ) व साहिल मोगरे ( 25 ) रा . वणी असे अटक करण्यात आलेले आरोपीचे नाव आहे.
शहरातील प्रगती नगर येथील सुषमा वाघमारे ह्यांच्या तक्रारी नुसार तक्रार कर्त्यांच्या मुलाकडे आरोपी यांचे कोणत्याही प्रकारचे पैसे नसून आरोपी यांनी मुलाकडे पैशाची मागणी केली. “मुलाचे खांद्यावर हात ठेवून, कॉलर पकडून आमचे सोबत चल नाहीतर किडनॅप करतो,” असे म्हणत गुंडगिरी करत जबरदस्तीने गाडीवर बसवून एका शाळेच्या मागे अंधारात नेवून हात बुक्यानी मारहाण केली. आणि तत्काळ 3000 हजार रुपये मागितले. व दुसऱ्या दिवशी 7000 हजार रुपये घेऊन ये नाहीतर तुला चाकूने मारहाण करतो, अशी धमकी देत अश्लिल भाषेत शिविगाळ केली. या तक्रारीवरून वणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी युवी मोगरे, व साहिल मोगरे, रा. सेवानगर (वणी) यांच्या सह इतर विरोधात विविध भा.द.वी कलमांतर्गत गुन्हा नोंद करून दोघांना अटक करण्यात आली.
Dysp गणेश किंद्रे,P.I अजित जाधव ठाणेदार वणी पो.स्टे.यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई डि बी पथक प्रमुख API माधव शिंदे, सुदर्शन वानोळे, पंकज उंबरकर, विशाल गेडाम, गजानन कुळमेथे, यांनी केली. अधिक तपास वणी पोलिस करीत आहे.