Saturday, August 29, 2026
HomeUncategorizedजन्माष्टमी उत्सवासाठी समिती गठित; तीन दिवसीय कार्यक्रमाचे नियोजन.

जन्माष्टमी उत्सवासाठी समिती गठित; तीन दिवसीय कार्यक्रमाचे नियोजन.

Ajay kandewar,Wani : येथील जय श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवाच्या आयोजनासाठी उत्साहात बैठक घेऊन उत्सव समितीची नव्याने निवड करण्यात आली. बैठकीत वर्ष २०२६-२७ साठी अध्यक्षपदी ॲड. कुणाल विजय चोरडिया यांची फेरनिवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी शुभम मदान व श्याम लाहोरिया, कार्याध्यक्षपदी राहुल मुंजेकर, सहकार्याध्यक्षपदी अभय नागतुरे, सचिवपदी उमेश पोदार, सहसचिवपदी सुधीर तलसे, कोषाध्यक्षपदी जयंत पांडे, सहकोषाध्यक्षपदी राजू हिंगोले, प्रसिद्धी प्रमुखपदी आशिष सिसोदिया (जैन), सहप्रसिद्धी प्रमुखपदी दीपक पाऊणकर, सोशल मीडिया प्रमुखपदी पार्थ त्रिवेदी तर प्रिंट मीडिया प्रमुखपदी सौरभ राजुरकर यांची निवड करण्यात आली.

उत्सवाच्या निमित्ताने यंदा तीन दिवसीय कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले असून, विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांसह जन्माष्टमी उत्सव उत्साहात साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. समितीच्या वरिष्ठ सल्लागारपदी विजय चोरडिया, आशिष गुप्ता, निकेत गुप्ता, विजय पुण्यानी, दिवान फरतानी, मुलचंद जोशी, राजाभाऊ बिलोरेरिया, महावीर कटारिया, नारायण गोदे, सुरेश मांडवकर, संतोष मार्कंडे, अनिल रंभे, विशाल दुधबडे, गजानन बतूलवार, पिंकी बावा, प्रा. दिलीप अलोणे व मधुर गोडाम यांचा समावेश आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page