मारेगाव:- रुग्णवाहिकेची कमतरता लक्षात घेता नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या मारेगाव शहरातील जनहित कल्याण संघटनेच्या वतीने नगरसेवक नंदेश्वर आसुटकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन रुग्णवाहिकेचे येथील मार्डी चौकात लोकार्पण करण्यात आले.यावेळी रुग्णवाहिकेचे स्वागत करत नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
येथील जनहित कल्याण संघटनेच्या वतीने शहरात ,शैक्षणिक, धार्मिक, आरोग्य विषयक आदी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.त्याचाच एक भाग म्हणून तालुका स्थळ असलेल्या मारेगाव शहरात रुग्णवाहिकेचे कमतरता असल्याची जाणीव लक्षात घेता,नगरसेवक नंदेश्वर आसुटकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन येथील मार्डी चौकात रुग्णवाहिकाचे लोकार्पण मोठ्या थाटात करण्यात आले.ही रुग्णवाहिका शहरात चोवीस तास उपलब्ध राहणार असुन नागरीकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सुद्धा जनहित कल्याण संघटनेचे संस्थापक गौरीशंकर खुराणा यांनी केले आहे.
या लोकार्पण सोहळ्यात संदीप खुराणा, गौरीशंकर खुराणा,रवी पोटे, नगरसेवक नंदेश्वर आसुटकर, वैभव पवार,हेमंत नरांजे,अनिल गेडाम,रॉयल सयद,निलेश तेलंग,सचिन देवाळकर,गौरव आसेकर, प्रफुल देवाळकर,आदी जनहित कल्याण संघटनेचे सभासद व शहरातील शेकडो नागरिक उपस्थित होते.