•रंगनाथ स्वामी मंदिर येथून दुपारी 2 वाजता बाईक रॅली काढण्यात येणार.
•कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे,असे आवाहन – डॉ. लोढा
विदर्भ न्युज,वणी: भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर काँग्रेसतर्फे प्रत्येक विधानसभा क्षेत्रात जनसंवाद पदयात्रेचे आयोजन करण्यात आले.महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार, पीकविमा, शेतक-यांचे विविध प्रश्न, धार्मिक सलोखा तसेच स्थानिक मुद्दयांबाबत नागरिकांशी संवाद साधण्यासाठी काँग्रेसतर्फे वणी विधानसभा क्षेत्रात भव्य अशी जनसंवाद यात्रा 4 सप्टेंबर ते 11 सप्टें पर्यंत काढण्यात आली.
वणी विधानसभा क्षेत्रात दि.4 सप्टेंबर रोजी झरी येथून जनसंवाद यात्रेचा शुभारंभ करण्यात आले.. झरी, मारेगाव आणि वणी अशा तीन तालुक्याचा दौरा करून या यात्रेचा मंगळवारी दि. 12 सप्टेंबर रोजी वणी येथे भव्य असा समारोप म्हणून दु. 2 वाजता रंगनाथ स्वामी मंदिर येथून बाईक रॅली काढण्यात येणार आहे.तर शेतकरी मंदिर हॉल येथे 4 वाजता समारोपीय कार्यक्रम पार पडणार आहे.
या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते प्रविण देशमुख राहणार आहे तर प्रमुख पाहुणे म्हणून वामनराव कासावार यांची उपस्थिती असणार आहे. या जनसंवाद समारोपीय कार्यक्रमाला मोठ्या संख्येने वणी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांनी सहभागी व्हावे,असे आवाहन पदयात्रेचे मुख्य समन्वयक डॉ. महेंद्र लोढा यांनी केले आहे.
यात्रेला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद …..
“जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचता आले. प्रत्येक गावात रॅलीचे उत्स्फुर्त स्वागत करण्यात आले. या यात्रे दरम्यान नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेता आल्या. प्रत्येक गावात कॉर्नर सभा तर मुख्य बाजारपेठेत सभा घेण्यात आली. या यात्रेदरम्यान अनेक गावातील नागरिकांनी पक्ष प्रवेश केला.”- डॉ. महेंद्र लोढा, मुख्य समन्वयक, जनसंवाद यात्रा.
@समारोपचा आधी दुपारी 2 वाजता बाईक रॅली……
“वणी येथे सकाळी 2 वाजता रंगनाथ स्वामी मंदिरातून बाईक रॅली निघणार आहे. चिखलगाव, गणेशपूर या गावात पोहोचल्यानंतर दु. 4 वाजता या रॅलीचा शेतकरी मंदिरात समारोप होणार आहे. त्यानंतर शेतकरी मंदिरातच समारोपीय सभा होणार आहे. बाईक रॅली व समारोपीय कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वणी विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले आहे.”