•नियमाची अंमलबजावणी करण्याचा दिला सल्ला.
अजय कंडेवार,वणी:- चांदा शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित जनता विद्यालय वणी येथे 23 ऑगस्ट बुधवार रोजी परिवहन समितीची स्थापना करण्यात आली त्या अनुषंगाने आयोजित सभेच्या अध्यक्षा मुख्याध्यापिका एम.डी जोगी होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून गोपाल हेपट तसेच प्रदीप भानारकर (वाहतूक शाखा, वणी) उपस्थित होते तसेच शाळेचे पर्यवेक्षक बोबडे पाळी प्रमुख कमलाकर देवाळकर उपस्थित होते. वाहतूक शाखेचे कर्मचारी गोपाल हेपट यांनी वाहतुकीच्या नियमाबद्दल ऑटो चालकांना नियमाचे अंमलबजावणी करण्यास सूचना केल्या. ज्यादा विद्यार्थी वाहनात बसून आणू नये ,तसेच वाहनाची कागदपत्रे अद्यावत करणे ,ऑटो शालेय परिसरात दाखल करणे ,इतरत्र कुठेही शाळेच्या बाहेर विद्यार्थ्यांना सोडू नये तसेच शिक्षकांना सुद्धा हेल्मेट घालने सक्तीचे आहे .त्यापासून कोणते फायदे होतात हे सुद्धा त्यांनी यावेळी सांगितले.
पर्यवेक्षक बोबडे,पाळी प्रमुख कमलाकर, देवाळकर यांनी सुद्धा उपस्थितांना मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका जोगी यांनी वाहतुकीचे नियम पाळा अपघात टाळा असा संदेश आपल्या अध्यक्षीय भाषणातून दिला .या सभेला बहुसंख्येने ऑटो चालक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन गजेंद्र काकडे यांनी केले व आभार प्रदर्शन मनोज खिरटकर यांनी मानले.