•विद्यार्थ्यांनी त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांचे केले सादरीकरण
वणी:- स्थानिक जनता करीअर लाँचरमधे अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा नुकताच सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांचे सादरीकरण केले.
चांदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. सौ. प्रतिभाताई जीवतोडे व सेक्रेटरी डॉ. अशोक जीवतोडे यांच्या मार्गदर्शनात झालेल्या या सांस्कृतिक कार्यक्रमात विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे, व्यवस्थापक प्रा. लीलाधर खंगार, माजी प्राचार्य बबनराव राजूरकर, प्रा. श्याम डोहे, प्रा. आल्हाद बहादे, प्रा. नितीन कुकडे, प्रा. सौ. विद्या शिंदे, प्रा. प्रेमा झोटींग, प्रा. रविकांत वरारकर, प्रा. निलेश तुरानकर, डॉ. उमाकांत देशमुख, प्रा. सचिन झाडे, प्रा. संदीप कासवटे, आदी उपस्थित होते.
विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतात. शैक्षणिक कार्यात व्यस्त असतात. त्यांना इतर कलागुण सादरीकरणास प्लॅटफॉर्म मिळावा, या हेतूने सदर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन होते. भाषण, कविता, नृत्य, गीत गायन, मिमिक्री, नाटिका आदी कलाविष्कार दाखवून विद्यार्थ्यांनी उपस्थितांचे मनोरंजन केले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विरंगुळा मिळाला. यानंतर पुढे येणाऱ्या बोर्ड परीक्षांची तयारी उत्तम करून चांगले गुण मिळवा, असे मार्गदर्शन शिक्षकांनी केले.