• सरपंच यांनी वेकोलि सब एरिया मॅनेजर ला घातले निवेदनाद्वारे साकडे.
अजय कंडेवार,वणी:- राजूर गावातील उत्तर भारतीयांना छठपूजेसाठी नियोजित तलावाची दुरुस्ती करून तलाव छठपूजेसाठी भाविकांना तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावे या करीता राजूर ग्रामपंचायत सरपंच विद्या पेरकावार यांनी ता.2 नोव्हेंबर रोजी निवेदनाद्वारे वेकोलि सब एरिया मॅनेजर यांना साकडे घातले आहे.
तालुक्यातील राजूर गाव हा ” मिनी इंडिया ” म्हणून विशेष आहे. या गावात विविध जाती धर्म चे लोक अनेक वर्षांपासून इथे वास्तव्यास आहे.वणी उपविभागात सर्वप्रथम राजुर कॉलरी येथे भुमीगत कोळसा खाणीची निर्मीती झाली. त्या परिसरात असलेल्या चुनाभटटी व कोळसा खाणीत स्थानिक भुमीपुञ काम करण्यास उत्सूक नसल्याने उत्तर भारतीय नागरीकांनी शिरकाव केला. राजुर कॉलरी येथे मोठया संख्येने उत्तर भारतीय वास्तव्यास आहेत. त्यांनी महाराष्ट्रीयन संस्कृती आत्मसात केलेली आहे. माञ ते आपले परंपरागत चालणारे त्यांचे सन उत्सव साजरे करतात. त्यातच छटपुजा हा महत्वाचा सन असुन नदी, तलाव किंवा जलसाठा असलेल्या ठिकाणी पुजाअर्चा केल्या जाते.
वेकोली बंकरजवळील तलावात गेल्या अनेक वर्षांपासून उत्तर भारतीय बांधवांकडून छठपूजा केली जाते. मात्र यंदा या तलावात काही सिव्हील काम डब्ल्यूसीएलकडून करण्यात येत आहे. त्यामुळे छठपूजेसाठी नियोजित केलेला हा तलाव छठपूजेसाठी योग्य नाही.त्यामुळे भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत.त्यामुळे त्यांच्यात रोष निर्माण होत आहे.या संतापामुळे काही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे.काही अनुचित घटना घडल्यास त्याला सर्वस्वी वेकोली प्रशासन जबाबदार असेल.या कारणास्तव तात्काळ छठपूजेसाठी नियोजित तलावाची दुरुस्ती करा आणि हा तलाव छठ पूजेसाठी उपलब्ध करा अशी सरपंच यांनी मागणी करीत निवेदनाचा प्रतीलिपी मुख्य महाप्रबंधक वेकोली भालर , मॅनेजर, वेकोली राजुर-भांदेवाडा व S.O.E सिव्हील वेकोली ,घोन्सा यांना पाठविण्यात आले.