•कानडा शेतशिवारात 32 लाख रुपये किंमतीच्या अल्युमिनियम तारांच्या बंडल वर दरोडा
•दरोड्यात अज्ञात दहा ते अकरा चोरट्यांचा सहभाग*
(उपसंपादक) नागेश रायपूरे,मारेगाव:-एखाद्या फिल्मी स्टाईल प्रमाणे कामावरील चौकीदारासह त्याच्या साथीदारांचे चाकू व पेचकसच्या धाकावर हात पाय बांधुन तब्बल 32 लाख रुपये किंमतीच्या अल्युमिनियम तारावर चक्क दहा ते अकरा अज्ञात चोरट्यानी दरोडा टाकल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील कानडा शेतशिवारात 7 नोव्हेंबरच्या रात्री 1 वाजता दरम्यान घडली.या दरोडा प्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात मारेगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहिती नुसार तालुक्यातील कानडा शेतशिवारात के.ई. सी.इंटरनॅशनल लिमिटेड एस. बी.यु.साऊथ एशिया कंपनी द्वारे 765 के.व्ही.डी. सी. वरोरा ते वरंगल दरम्यान टॉवर प्रोजेक्ट काम चालू आहे. यात फिर्यादी आलम बाबर अली (23) रा.कुमरगंज (पश्चिम बंगाल) व त्याचा साथीदार जलील अली (55) हे सदर टॉवर प्रोजेक्ट च्या मौल्यवान वस्तुंच्या देखरेखेसाठी चौकीदार म्हणून काम करतात.सदर प्रोजेक्ट चे काम सकाळी 9 ते सायं. 6 परंत चालू असते.सायं. 6 नंतर घटनास्थळी देखरेखसाठी असलेले फिर्यादी आलम व त्याचा साथीदार जलील हे दोघेच आपली ड्युटी करत असते.याचाच फायदा उचलत त्या दहा ते अकरा अज्ञात चोरट्यानी चक्क चाकू व पेचकसच्या धाकावर चौकीदारांसह त्याच्या साथीदाराचे हात पाय बांधून चक्क 32 लाख रुपये किमतीच्या अल्युमिनियम तारांचे 8 बंडल चोरी करुन पसार झाले.
चोरट्यानी असा साधला डाव……
7 नोव्हेंबरच्या रात्री 1 वाजता दरम्यान फिर्यादी चौकीदार व साथीदार हे कामाच्या साईडवरील झोपडीत ड्युटी करत होते.दरम्यान दोन अज्ञात इसम अचानक आले व चाकू व पेचकसच्या धाकावर त्यांना पकडुन दोघांचे हात पाय दुपट्यानी बांधले.व यांच्या जवळ असलेल्या मोबाईलची मागणी केली. फिर्यादीने मोबाईल देण्यास नकार दिला असता, त्या दोन अज्ञात चोरट्यानी चाकू व पेचकसच्या जोरावर मारुन टाकण्याचा धाक दाखवत गालावर थापडा मारत मोबाईल हिसकवला व त्यातले सिम कार्ड काडून हस्तगत केला.व झोपडीत असलेल्या फिर्यादी च्या बेगमधील 2 हजार रुपये आरोपीने आपल्या खिशात टाकले व घटना स्थळावरून पासुन 100 मिटर अंतरावर त्यांना हात पाय बांधून ठेवले व “यहासे हिलोगे तो अपनी जाण गमाकर बैठोगे” अशी धमकी देत ते दोन अज्ञात चोरटे यांच्या हालचालीवर लक्ष ठेवत बसले.दरम्यान घटनास्थळी दोन दहा चक्का ट्रकमधून 8 ते 9 अज्ञात चोरटे खाली उतरले व साईडवर असलेले हैड्रॉ (क्रेन) एकाने सुरू करुन या साह्याने त्या दोन्ही ट्रकमध्ये त्या अज्ञात चोरट्यानी साईडवर असलेल्या मौल्यवान अल्युमिनियम तार वायडिंग चे बंडल ट्रक मध्ये चढवत असतांना ते क्रेन मशीन बंद पडली. त्यामुळे त्या दरोडेखोरांना केवळ 3 टनाच्या वजनाचे 8 ड्रम बंडल असे एकूण 24 टन अल्युमिनियम तारांच्या ड्रम ट्रक मध्ये चढवण्यास समाधान मानावे लागले.
दरम्यान घटनेनंतर बांधून असलेल्या फिर्यादी चौकीदार व त्याच्या साथीदाराला सकाळी एका शेतकऱ्याने सुटका केली.व गावातील एका व्यक्तीच्या मोबाईल द्वारे घडलेली सगळी हकीकत आपल्या ठेकेदाराला सांगितले दरम्यान फिर्यादी ने पोलीस स्टेशन गाठत त्या अज्ञात दहा ते अकरा चोरट्या विरोधात तक्रार दाखल केली असता मारेगाव पोलिसांनी या दरोडा प्रकरणी कलम 395,397 अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे.फिर्यादीच्या बयानावरून सदर अज्ञात चोरटे हे हिंदी मराठी भाषा बोलत असल्याचे उघडकीस आले आहे.या घटनेत चक्क दहा ते अकरा चोरटे सहभागी असुन मारेगाव पोलिसां समोर या चोरट्याचा शोध लावण्यासाठी मोठे आवाहन उभे झाले आहे.