• ठाण्यात संख्याबळ कमी आणि कसरत जास्त,तरीही वणी ठाणेदार जाधव आव्हान पेलण्यास सज्ज
अजय कंडेवार,वणी:- गेल्या काही महिन्यात मोठ्या प्रमाणात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. तालुक्यात सर्वात जास्त चोऱ्या ह्या काही महिन्यात झाल्या आहेत. दुचाकी वाहने,पाण्याच्या मोटरिंपासून ते घरातील वस्तू,दागिने किंमती समानासह अनेक वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. विशेष चोऱ्यांचे एक पॅटर्न समोर आले आहे. एकाच साच्यात चोरी न करता वेगवेगळ्या ठिकाणी व पद्धतीने चोऱ्या केल्या जात आहेत. म्हणजे फक्त दुचाकी किंवा फक्त दागिने असे न करता चोऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या केल्या जात आहेत. कदाचित ह्या सर्व चोऱ्या करणारी एक टोळी कार्यरत असू शकते.Strong increase in the amount of theft, complaints continue in Thane every day.
फक्त शहरी भागातच चोऱ्या होत नसून विशेष म्हणजे संपूर्ण तालुक्यात चोऱ्या होत आहेत.म्हणजेच एका पेक्षा अधिक लोक यात समाविष्ट असावेत.अगदी मार्केट परिसर ले आउट, कॉलोनी देखील चोरट्यांनी सोडलेला नाही.चोऱ्यांचे कारण अजून पर्यंत समोर आले नाही. कोरोनाच्या काळापासून सर्वांवरच आर्थिक बिकट परिस्थिती कोसळली आहे.रोजगार बंद झाले आहेत.हातांना काम नाही घरची खाणारी तोंडे बंद नाहीत.या पार्श्वभूमीवर चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे का? यासाठी कोणाला जबाबदार धरावे? सामान्य जनता सुरक्षित नाही.यातून मोठे प्रकार उद्धभवू शकतात.मोठ्या गुन्ह्यांमध्ये याचे रूपांतर होऊ शकते. गुन्हेगारांची संख्या वाढत आहे. परिस्थिती किंवा स्वखुशी ने जरी अश्या अधिक प्रमाणात चोऱ्या होत असतील तर निश्चितच हे वणी तालुक्याच्या कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने घातक आहे. वणी पोलिसांचे खबरी नेटवर्क तसे स्ट्रॉंग आहे असे म्हटले जाते.
सतत होणाऱ्या चोऱ्यांमुळे नागरिक असुरक्षित झाले आहेत. थोडं ही बाहेर गेले की चोरी होते अशी धारणा व धास्ती मनात बसली आहे. अगदी दवाखान्यात जाताना देखील चार वेळा विचार करावा लागतो असे मत एका नागरिकाने व्यक्त केले आहे.एका नागरिकाने तर पत्नी आजारी आहे पण तिला घेऊन दवाखान्यात गेलो आणि मागे चोरी झाली तर या भितीने पत्नीला एकटीलाच दवाखान्यात रवाना केले. अत्यंत कष्टाने निर्माण केलेल्या आपल्या संसारातील वस्तू चोरटा काही क्षणात लंपास करतो आणि वर चोरी झाल्या नंतर केस करा,गुन्हा दाखल करा आणि न्यायासाठी वर्षानुवर्षे वाट पाहत बसा..चोर मिळाला तर वस्तू मिळणार अन्यथा नाही..त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.