•अवघ्या 12 तासाचा आत आरोपी जेरबंद.
अजय कंडेवार,वणी :- शिरपूर पोलीसस्टेशन अंतर्गत असलेले चंडकापुर गावात घरफोडी करणाऱ्या एका चोरट्याला शिरपूर पोलिसांनी अवघ्या 12 तासाचा आत जेरबंद केले व त्याच्याकडून 24 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून विविध कलम अंतर्गत शिरपूर पोलीस स्टेशन येथे गून्हा दाखल करण्यात आला.Stolen goods, Shirpur police did the maximum again.
चेंडकापुर येथील गिता धनीराम अहिरवार हिने काबाड कष्ट करून घरात जमा करून ठेवलेले नगदी 25 हजार रू कोणीतरी अज्ञात चोरट्याने नेले असल्याची तक्रार दि.4 सप्टें. रोजी दाखल करताच शिरपूर ठाणेदार गजानन करेवाड व यांच्या चमुनी सदरचा गावात जाऊन चक्रे फिरविली असता 12 तासाचा आताच चेंडकापुर गावातील विनोद सूर्यभान इंगोले वय (30) याला पोलिसी खाक्या दाखविताच गुन्ह्याची कबुली दिली त्याचाकडून चोरी केलेला मुद्देमाल 24 हजार रूपये हस्तगत करण्यात शिरपुर पोलीसांना यश आले.शिरपूर पोलिसांचा कामगिरीबद्दल कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. अवघ्या 7 दिवसात दुसरा घरफोडीचा गुन्हा उघड केल्याने जनसामान्यात पोलिसांबद्दल आणखी आदर वाढला आहे.
सदरची कारवाई ठाणेदार गजानन करेवाड यांचा मार्गदर्शनात ,PSI रामेश्र्वर कांडूरे,अनिल सुरपाम, अभिजित कोष्टवार,विनोद काकडे, गंगाधर घोडाम यांनी केली असून गुन्ह्याचा पुढील तपास PSI रामेश्र्वर कांडूरे व अनिल सुरपाम करीत आहे.