•अवघ्या 7 महिन्यासाठी पदांची खिरापत का ?
अजय कंडेवार,वणी :- भारत सरकारच्या दूरसंचार अमरावती विभागीय सल्लागार समितीच्या सदस्यपदी वणी शहरातीलच चोरडिया, पिदुरकर पाठोपाठ…. आता रवि बेलुरकर यांचीही निवड करण्यात आली आहे. After Chordia, Pidurkar…. Now Ravi Belurkar too in Telecom Committee.
भारत सरकार संचार मंत्रालय अमरावती विभागीय दूरसंचार सल्लागार समिती सदस्यपदी दि,11 जाने 2024 रोजी दूरसंचार भारत सरकार विभागातर्फे पत्रक प्राप्त झाले.त्यांनी पाठविलेल्या पत्रकात आणखी वणीतीलच रवि बेलुकर यांनाही दूरसंचार सल्लागार समिती अमरावती विभागीय समितीवर काम करण्याची संधी दिली. माञ वणी शहरातीलच तिघांची सदस्यपदी निवड करण्यात आली.
अवघ्या 7 महिन्यासाठी पदांची खिरापत का.?
” केंद्रीय दूरसंचार विभागाने विभागीय सल्लागार समितीच्या सदस्यपदीनी वणी शहरातूनच 3 सदस्यांची निवड केली आहे. दूरसंचार मंत्रालयाने डिसेंबर महिन्यात परिपत्रक काढून सक्षम प्राधिकीकरणांचा मान्यतेवर करण्यात आलेली निवड दि.13.जुलै 2024 पर्यंत वैध असणारं आहे. केंद्र शासनाने अवघ्या 7 महिन्यासाठी वाटलेली पदांची खिरापत निश्चितच संभ्रम निर्माण करणारी आहे.