•गंभीर स्थिती, नागपूरला रवाना.
सुरेंद्र इखारे,वणी – तालुक्याची लोकसंख्या ही दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे तसेच औद्योगिक क्षेत्र असल्याने विविध राज्यातील नागरिकांचे वास्तव्य या ठिकाणी असल्याने गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यावर अंकुश मिळविण्यासाठी व संपूर्ण शहराची कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी एकाच पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत असून त्या अपुऱ्या कर्मचार्यांच्या कायदा व सुव्यवस्थेचा फायदा घेत वणी शहरातील अट्टल घरफोड्या व दरोडा टाकणाऱ्या टोळ्यांनी आपला मोर्चा शहरातच वळवला आहे . त्यामुळे शहरातील नगरीत भयभीत आहे.
एक महिन्यात जवळपास वणी शहरात अनेक घरफोडी ,फसवणूक, यासारख्या घटना दररोज घडत असल्याने आज वणी शहरातील मुख्य रस्त्यावरील असिफ शेख हे डब्ल्यू सिएल चे कर्मचारी तसेच लोकमतचे पत्रकार असून त्यांचे राहते घरी पहाटेच्या सुमारास एका चोरट्यांने त्यांच्या घरात चोरीच्या निमित्ताने प्रवेश केला असता तो चोर व असिफ शेख समोरासमोर आल्याने ग त्यांचेवर लोखंडी राड ने हल्ला चढवला त्यात ते गँभिर जखमी झाले व त्या नामवंत घरफोड्या चोरट्याने पळ काढला आहे अश्या नित्याच्या घटना घडत आहे. परंतू तो गब्ब्या असू शकतो असेही शहरात चर्चा आहे.
तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वणी शहरातील घटनांचा विचार करून पोलीस प्रशासनावर कारवाई करून वणी शहरातील नागरिकांना अट्टल गुन्हेगारांच्या दहशतीतून नागरिकांना संरक्षण द्यावे. तेव्हा त्वरित अट्टल गुन्हेगारांचा बंदोबस्त करून नागरिकांना दहशतीतुन बाहेर काढावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे .