•मॅकरून सिटी ब्रांचचा स्तुत्यमय उपक्रम.
•विविध वेशभूषा ठरले आकर्षण : पर्यावरण, अंधश्रद्धा, बेटी बचाओ, महागाई, स्त्री अत्याचारावर दिले संदेश.
विदर्भ न्युज डेस्क,वणी:- मॅकरून स्टुडंट्स् अकॅडमी सीबीएसई (सिटी ब्रांच) शाळेत लाकडी बैलाची आकर्षक सजावट करून आपल्या डौलदार नंदीसोबत सामाजिक संदेश मनात घेवून शाळेचे उपक्रमशील नंदी सजावट स्पर्धा विद्यार्थ्यांनी उत्साहाच्या वातावरणात साजरा केला.
पारंपरिक पोळा म्हणजे शेतकऱ्यांचा महत्वाचा घटक आणि सण असतो. वर्षभर शेतात राबून शेतकऱ्याच्या कुटुंबास व समस्त जनतेस जगवितो अश्या महान कष्टकरी बैलास एक दिवस आराम मिळावा त्याला सन्मानाने गोड गोड पदार्थ खाऊ घालून बैल पोळा साजरा केला जातो. त्याच सोबत भावी पिढीतील बालकांना शेतकऱ्यांप्रती व बैलांबद्दल पूर्णपणे माहिती व्हावी, यासाठी दुसऱ्या दिवशी तान्हा पोळ्याचे आयोजन केल्या जाते. त्याच प्रमाणे दरवर्षीची परंपरा कायम ठेवत याही वर्षी दि.16 सप्टेंबर रोज शनिवारला मॅकरून शाळेत तान्हा पोळा (नंदी सजावट) स्पर्धा घेण्यात आली. असे करतांना कदाचित लहान मुलांकडे उद्याचा शेतकरी म्हणून बघितले पाहिजे .त्याला शेतकऱ्यासह बैलाप्रती ज्ञान व्हावी. शेतकरी हा जगाचा पोशिंदा हेच ब्रीद लक्षात आणुन देवून त्यांना या नंदी सजावट स्पर्धा सारखे उपक्रम राबवून बैलांप्रती कृतज्ञाता कळली पाहिजे हा मानस मॅकरून सिटी ब्रांच चा उद्देश होता.
यावेळी कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी शाळेतील मुख्यद्यापिका अश्विनी ढोले यांचा मार्गदर्शनात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.