अजय कंडेवार,वणी:- जि.प.चिखलगाव शाळा येथे दिनांक 1/10/2022 रोज शनिवारला सकाळी 11:30 वाजता केंद्र चिखलगांव अंतर्गत शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले.परिषदचे अध्यक्षस्थानी भास्कर दुमोरे (उच्च श्रेणी मुख्याध्यापक वागदरा(नविन)) यांनी भूषविले. प्रमुख उपस्थिती म्हणून एन.बी.देवतळे (माजी प्र.गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती, वणी.) एन.एन.बोबडे(केंद्रप्रमुख चिखलगांव),नासरे सर ,घोनमोडे सर (बी.आर.सी)यांचे उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.


केंद्रप्रमुख नामदेव बोबडे यांनी प्रास्ताविकातून शैक्षणिक उपक्रमाबद्दल माहिती दिली.नासरे यांनी विविध उपक्रमाचा आढावा घेतला व मार्गदर्शन केले.देवतळे( माजी गटशिक्षणाधिकारी )यांनी विविध उपक्रमाबद्दल माहिती दिली.परिषदेनंतर शेवटच्या टप्प्यात सेवानिवृत्त देवतळे साहेब गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती वणी,टोंगे , भोरे , उपरे व पाटी यांचा सर्व शिक्षकांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.


कार्यक्रमाचे संचालन वसुधा ढाकणे (स.शिक्षिका लालगुडा) यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रकाश तालावार(स.शिक्षक,धोपटाळा) यांनी केले.

