विदर्भ न्यूज डेस्क,वणी :- तालुक्यातील चिखलगाव येथे सार्वजनिक शिव मंदीर देवस्थान व श्री शंकरबाबा पदावली भजन मंडळ चिखलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य पदावली भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
महाशिवरात्री महोत्सव 2023 च्या पार्श्वभूमीवर सार्व. शिव मंदीर देवस्थान व श्री शंकरबाबा पदावली भजन मंडळ चिखलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दि.18,19 व 20 फेब्रुवारी 2023 रोजी चिखलगाव येथील शिवमंदीर देवस्थान च्या पटांगणात भव्य पदावली भजन स्पर्धा होणार आहे. लाखों बक्षीसांची भव्य लूट असून बाहेरगावावरून येणाऱ्या भजन मंडळाची भोजन व्यवस्था स्थानिक मंडळाद्वारे केली आहे. अधिक माहिती करिता मनोज नवले, सचिन नागपुरे,आशुतोष काकडे, सुनील मोहुर्ले, व आकाश ठेंगणे यांच्याशी संपर्क साधावा.
या स्पर्धेचा लाभ परिसरातील पदावली भजन मंडळानी घ्यावा असे आवाहन सार्व. शिव मंदीर देवस्थान, श्री शंकरबाबा पदावली भजन मंडळ तथा चिखलगाव ग्रामवासी यांचे वतीने करण्यात येत आहे.