चंद्रपूर : चांदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. स प्रतिभाताई जीवतोडे यांच्या आई, सेक्रेटरी डॉ. अशोक जीवतोडे यांच्या सासूबाई व स्व. गजानन निखाडे यांच्या पत्नी रुखमाबाई निखाडे यांचे आज (दि.४) ला पहाटे १ वाजता निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या. रुखमाबाई निखाडे या चांदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या सदस्य देखील होत्या. त्यांच्या पार्थिवावर खैरी (ढालगाव), ता. सावनेर, जिल्हा नागपूर येथे आज दुपारी १.०० वाजता अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात खूप मोठा आप्त परीवार आहे.
त्यांच्या जाण्याने जनता परीवार शोकाकुल आहे.