•परिसरात किरण देरकर यांचा खंबीर नेतृत्वात महीला एकत्रीकरनाचे वारे वाहू लागले…
अजय कंडेवार,वणी:-सन्मान स्त्री शक्ती फाऊंडेशनचा वतीने ढाकोरी येथे हळदी कुंकूचे औचित्यसाधून”वाण आरोग्याचे”या कार्यक्रमाचे आयोजन काल दि. 21.जाने करण्यात आले.
घरातील महिला आनंदी, निरोगी असेल तर संपूर्ण कुटुंबाचे स्वास्थ्य चांगले राहते. महिलांनी गृहकर्तव्य बजवताना स्वत:च्या आरोग्याबाबतही तितकेच जागरूक राहिले पाहिजे. प्रकृतीच्या छोट्या तक्रारीकडेही वेळीच लक्ष देऊन काळजी घेतली पाहिजे. आरोग्याचे वाण ही आजच्या काळाची गरज आहे, असे प्रतिपादन सन्मान स्त्री शक्ती फाऊंडेशनचा अध्यक्षा किरण देरकर यांनी केले. या कार्यक्रमात अनेक महिलांनी उपस्थिती दर्शविली व अतिशय उत्साहात हा महिलांचा कार्यक्रम पार पडला. तसेच या गावात अवैध दारू विरोधात एल्गार पुकारणाऱ्या महिलेचाही किरण देरकर यांनी कार्याचा आढावा घेत शायरा शेख, रंगूबाई भोस्कर, रंजना ताजने, छाया बलकी, किरण काकडे, सपना सातपुते या महिलेचाही संघटनेचा वतीने गौरव करण्यात आले. या कार्यक्रमात ढाकोरी परिसरातील 300 पेक्षा जास्त महिला उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाला उपस्थीत महिलांनी आपल्या कला सादर केल्या. यावेळी सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन च्या सदस्या वैशाली देठे,सुरेखा ढेंगळे,मीनाक्षी मोहिते,सरपंच अजय कवरासे, उपसरपंच, आकाश आसुटकर उपस्थीत होते . कार्यक्रम यशस्वीतेसाठी गावातील सरपंच, सर्व महीला बचत गट व युवकांनी सहकार्य केले.