•भाजप कामगार मोर्चाच्या संयोजकपदी उमेश बोढेकर .
•सर्व कामगारांना संघटित करून त्यांच्या समस्या मार्गी लावणार – उमेश बोढेकर
अजय कंडेवार,वणी:- चंद्रपूर -वणी-आर्णी लोकसभा मतदार संघाच्या कामगारांचा समस्याचा डोंगर लक्षात घेत कामगार मंत्री सुरेश खाडे ,प्रदेशाध्यक्ष कामगार मोर्चा विजय हरगुडे ,प्रदेश उपाध्यक्ष अजय दुबे,प्रदेश महामंत्री हनमंत लांडगे,प्रदेश सचिव भास्कर बराते, पूर्व विदर्भ संघटक धनंजय वैद्य,प्रदेश महामंत्री मिलिंद देशपांडे या पदाधिकाऱ्यांचा विशेष उपस्थितीत उमेश बोढेकर यांच्या खांद्यावर चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघाकरीता उमेश बोढेकर यांची भाजप कामगार मोर्चाच्या संयोजकपदी निवड करीत कामगार मंत्री सुरेश खाडे , कामगार मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय हरगुडे यांचा हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
“उमेश बोढेकर जनसामन्यांचा नेता म्हणुन विशेष ओळख आहे. यांनी भाजप कामगार मोर्चाच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पद भूषविले आहे. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघाकरीता हा धडाकेबाज सक्षम नेता कामगारांचे प्रश्न निकाली काढण्याची हिंमत असलेले नेतृत्व कामगारांचा वाली बनणार यामुळे कामगार क्षेत्रात आनंद व्यक्त होत असून या निवडीचे सर्वांनी जोरदार स्वागतही करण्यात आले.”
या निवडीचे श्रेय वनमंत्री सुधीर मुनगंटीवार,माजी खासदार तथा ओबीसी महामंडळाचे केंद्रीय अध्यक्ष हंसराज अहिर,वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, भाजपा जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांना दिले.