•पदाधिकारी व कार्यकर्त्यांत “राजूभाऊ”ला पसंती.
अजय कंडेवार,वणी:-आगामी लोकसभा निवडणुकीत मनसे पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे, मनसेने त्या दृष्टीने तयारी देखील सुरु केलीय. यातच आता महाराष्ट्र सैनिक चंद्रपूर लोकसभेसाठी पक्ष नेतृत्वाकडे आग्रही करीत असल्याचे दिसून येतं आहे. तर या निवडणुका करिता वणीच्या राजु उंबरकराना संभाव्य उमेदवार म्हणून महाराष्ट्र सैनिकांनी पसंतीही दर्शविली आहे.उंबरकरांना पक्षाकडून लोकसभेची जबाबदारी देऊन “विदर्भामध्ये पहिला खासदार” निवडून आणण्यासाठी चंग बांधल्या जात आहे.निवडणूक लढण्याची तयारी केल्याची बातमी समोर येत आहे. आता मनसेचा विदर्भातील पहिलाच लोकप्रिय खासदार म्हणून लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहे.
या लोकसभेतील 6 विधानसभा क्षेत्रात मनसेची चांगलीच पकड असून, कार्यकर्त्यांची मोठी फळी पक्षाकडे आहे. याचाच फायदा आता येणाऱ्या निवडणुकांत पक्षाला होईल असा अंदाज राजकीय वर्तुळात ठरवल्या जात आहे. कारण चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात मनसेचे दमदार प्राबल्य असून, याची मदत गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या धानोरकरांना झाली होती यात काहीं शंका नाहीं. चंद्रपूर जिल्ह्यातील पक्ष पदाधिकाऱ्यांकडून व महाराष्ट्र सैनिकांकडून सुद्धा राजूभाऊ उंबरकर यांच्या नावाला ग्रीन सिग्नल दाखवून “भावी खासदार राजुभाऊ उंबरकर”असतील अशी घोषणाही केली जात आहे.राजूभाऊ उंबरकर यांच्या तरुणांमधील फेसबुक, वॉटसपअप, इंस्टाग्राम यामधे वाढत्या लोकप्रियतेने हालचालींनी यातील गूढही वाढतच चालले आहे. परंतू जनतेतही चंद्रपूर लोकसभेसाठी “भावी खासदार म्हणून “राजूभाऊ उंबरकर” ला पहिली पसंती देण्यात येत आहे . मागिल २० वर्षापासून उंबरकरानी आपली ताकद मजबूत ठेवून विरोधकांना तगडे आव्हान निर्माण केले.येत्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी व विरोधकांनाही मनसेच आव्हान स्विकारावे लागेल.